आशाताई बच्छाव
तथागत बुध्द जयंती निमित्त 12 रोजी चाळीसगाव येथे धम्म शांती यात्रा व बौध्द बांधवांचा मेळावा
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – तथागत गौतम बुध्द जयंती उत्सव समिती व चाळीसगांव तालुका बौध्द पंचायत च्या वतीने
महाकारुणिक तथागत गौतम बुध्द जयंती निमित्त दि. 12 मे 2025 सोमवार रोजी चाळीसगांव शहरात तालुकास्तरीय धम्म शांती यात्रा व बौध्द बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
दि 12 रोजी सायंकाळी 6 वाजता रेल्वे स्टेशन जवळील चाळीसगांव तालुका बौध्द पंचायत कार्यालय पासून धम्म शांती यात्रेला सुरुवात होणार असून सायंकाळी 7 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे धम्म शांती यात्रा विसर्जित होवून बौद्ध बांधवांचा मेळावा होणार आहे.
मेळाव्यात तालुकास्तरीय बुध्दविहार निर्माण करणे, तालुक्यातील बौध्द बांधवांची नोंदणी करणे, शिक्षण व व्यवसाय विषयक मार्गदर्शन केंद्र तयार करणे या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
समाज बांधवांनी परिवारासह उपस्थित रहावे असे आवाहन चाळीसगांव तालुका बौध्द पंचायत अध्यक्ष माजी आमदार साहेबराव घोडे, सरचिटणीस धर्मभूषण बागुल, कार्याध्यक्ष गौतम झाल्टे, उपाध्यक्ष रामचंद्र जाधव, कोषाध्यक्ष महेश चव्हाण, सहसचिव ऍड राहुल जाधव, संचालक गौतम जाधव, किरण जाधव, सुधाकर मोरे, रवींद्र निकम, सौ सोनाली लोखंडे यांनी केले आहे.
यासाठी अधिक परिश्रम व्यवस्थापन समिती तथागत गौतम बुद्ध जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष – देविदास जाधव, कार्याध्यक्ष – युवराज (संभाआप्पा) जाधव, उपाध्यक्ष – दिनेश मोरे, अमोल घोडे, सचिव – सुजित जाधव भैय्यासाहेब जाधव, संपर्कप्रमुख – मनोज जाधव, विजय नाना जाधव, विष्णु जाधव, अजय सोनवणे, सागर निकम, स्वप्निल जाधव (बंटी), सभा व्यवस्थापन प्रमुख – रोशन जाधव, बबलू जाधव, किरण मोरे, धम्मयात्रा नियोजन प्रमुख – महेंद्र यशवंत जाधव, रमेश सोनवणे, महेंद्र बिऱ्हाडे, आनंदा बागुल, तुषार मोरे, सचिन मोरे, स्टेज सजावट प्रमुख – शरद अण्णा जाधव, रथ सजावट प्रमुख – धनंजय अहिरे, अवधेश बागु, प्रसिद्धी प्रमुख – सूर्यकांत कद, सदस्य – बाबा पगारे, विजय मोरे, विशाल पगारे, धम्मपाल अहिरे, वीरेंद्र जाधव, अमोल पगारे, सागर जाधव, शाम जाधव, शुभम मोरे, कैलास निकम, संदिप भारत बागुल, गौरव जाधव, गोपाल भालेराव, संदिप दिलीप बागुल घेत आहेत.






