Home जालना वीजग्राहक आपले दैवत; त्यांना सर्वोत्कृष्ट सेवा द्या सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंढेकर यांचे...

वीजग्राहक आपले दैवत; त्यांना सर्वोत्कृष्ट सेवा द्या सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंढेकर यांचे आवाहन

90

आशाताई बच्छाव

1001490803.jpg

वीजग्राहक आपले दैवत; त्यांना सर्वोत्कृष्ट सेवा द्या
सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंढेकर यांचे आवाहन
जालन्यात वीज कर्मचाऱ्यांशी संवाद मेळावा उत्साहात
जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ: वीजग्राहक आपले दैवत आहेत. त्यांना अखंडित वीजपुरवठ्यासह सर्वोत्कृष्ट सेवा द्या. तसेच वीजबिलांच्या 100 टक्के वसुलीसह वीजचोरी रोखण्याकडेही कटाक्षाने लक्ष द्या, असे आवाहन महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंढेकर यांनी केले.
जालन्यातील मातोश्री लॉन्स येथे शनिवारी (10 मे) जिल्ह्यातील जनमित्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संवाद मेळावा पार पडला. यावेळी औंढेकर बोलत होते. या कार्यक्रमास अधीक्षक अभियंता संजय सरग, प्रभारी उपमहाव्यवस्थापक चंद्रकांत खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना औंढेकर म्हणाले की, जनमित्र (लाईनमन) हा महावितरणचा चेहरा आहे. सर्व जनमित्रांनी नेहमी गणवेशात रहावे. त्यामुळे जनमानसात सकारात्मक संदेश जातो. कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साधने दिली जातील. कर्मचाऱ्यांनी विद्युत यंत्रणेवर काम करताना त्याचा कटाक्षाने वापर करावा.
जालना जिल्ह्यात उच्चदाब ग्राहकांकडून सर्वाधिक महसूल जमा होतो हे भूषणावह आहे. जिल्ह्यातील ग्राहकांना दैवत मानून त्यांची इमानेइतबारे सेवा करा. ग्राहकांना सुरळीत वीज व सर्वोत्तम सेवा दिली तर वीजबिल वसुली करणेही सोपे जाते. यावेळी मार्च महिन्यात केलेल्या वीजबील वसुलीचे कौतुक करत, गावांची थकबाकी शून्य केलेल्या तीन जनमित्रांचा औंढेकर यांनी सत्कार केला. वीजबिल वसुलीवरच महावितणचा डोलारा उभा आहे. त्यामुळे प्रत्येक महिना हा मार्च समजूनच प्रत्येकाने कार्यरत रहायला हवे, अशा सूचना त्यांनी केल्या.

Previous articleहिंदू क्रांतीसूर्य महाराणा प्रताप सिंह यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
Next articleमुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात बी फार्मसी परीक्षा सुरळीत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.