Home जालना माहोरा येथील माजी सरपंच अंजनाबाई कासोद यांचे अपघाती निधन

माहोरा येथील माजी सरपंच अंजनाबाई कासोद यांचे अपघाती निधन

141

आशाताई बच्छाव

1001490629.jpg

माहोरा येथील माजी सरपंच अंजनाबाई कासोद यांचे अपघाती निधन

जाफराबाद प्रतिनिधि मुरलीधर डहाके

माहोरा येथील माजी सरपंच अंजनाबाई जनार्दन कासोद यांचे दिनांक 9 मे रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास जाफराबाद माहोरा रोडवर त्यांच्या राहत्या घराच्या समोर एका अज्ञात मोटारसायकल ने जोरदार धडक दिल्याने त्या रोडवर पडल्या या धडकेत त्यांच्या डोक्याला मार लागला . त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तपासणी केली असता मृत घोषीत केले. असे त्यांचे अपघाती निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, मुलगा, तीन मुली, दीर, जावई, नातवंडे आणि खूप मोठा कासोद परीवार आहे. त्यांचा अचानक अपघाती निधननाने माहोरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम त्यांच्याच शेतात 10 मे शनिवार रोजी सकाळी 10 वाजता झाला. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी माहोरा परिसरातून तसेच जाफराबाद तालुक्यातून मोठया प्रमाणात महिला व नागरीक उपस्थित होते.

Previous articleनिगडी ते लोणावळा’ मेट्रो डीपीआर तयार करा; मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांची मागणी
Next articleवक्फ सुधार जनजागरण अभियान अंतर्गत भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाची कार्यशाला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.