आशाताई बच्छाव
नियमबाह्य पद्धतीने गैरकारभार करणाऱ्या मे. विद्युत मंडळ माजी अप्रेंटिस सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था कन्नड या एजन्सी ला तात्काळ काळ्या यादीत टाका – संभाजी सेनेची मागणी
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – म.रा.वि.वी. कं. च्या नियमानुसार शैक्षणिक अर्हता आणि अनेक वर्षांचा आपल्याच म.रा.वि.वी. कं मध्ये कामाचा अनुभव असलेले अनुभवी परिपूर्ण कार्यकुशल असलेले बाह्यस्त्रोत कर्मचारी यांना पूर्ववत कामावर हजर करून घ्यावे व लोकप्रतिनिधी तसेच अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांना न जुमानता बेदरकारपणे नियमबाह्य पद्धतीने गैरकारभार करणाऱ्या मे. विद्युत मंडळ माजी अप्रेंटिस सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था कन्नड या संस्थेला (एजन्सीला) तात्काळ काळ्या यादी (ब्लॅक लिस्ट) मध्ये टाका अशी मागणी निवेदनाद्वारे संभाजी सेनेच्या वतीने दि 8/5/25 रोजी मा. कार्यकारी अभियंता
म.रा.वि.वि.कं. चाळीसगांव, अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. जळगांव मंडळ. यांना कार्यकारी अभियंता चाळीसगांव यांचे मार्फत करण्यात आली असून असे न झाल्यास छञपती संभाजी सेना चाळीसगांव महावितरण कंपनीच्या हीरापुर रोडवरील कार्यालया समोरील हीरपुर रोडवर 19 मे रोजी रस्ता रोको आंदोलन करेल प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत सर्वस्वी आपण आणि आपली महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी आणि आपले शासन प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की सदर संस्था ही म.रा.वी.वी.कंपनीस बह्यास्त्रोत कर्मचारी पुरविताना नियमबाह्य पद्धतीचा अवलंब करीत अगदी आपल्या नाकावर टिच्चून कारभार करीत आहे.
याबाबत चाळीसगांवचे आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील सदर कंपनीला काळ्या यादीत टाकण्यासाठी अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं. जळगांव मंडळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलेले आहे दिनांक 1 फेब्रुवारी 25 रोजी बाह्यस्त्रोत कर्मचारी भरती प्रकरणी संबधित कर्मचारी पुरवठा धारक संस्थेने केलेले नियमबाह्य कामे आणि भ्रष्टाचार या बाबतची पुराव्यांसह तक्रार 458/2024-25 अन्वये पोलिस अधिक्षक जळगांव मुख्यमंत्री देवंद्र फडणविस, जिल्हाधिकारी जळगाव आधिक्षक अभियंता जळगांव मंडळ तसेच चाळीसगाव कार्यालयाला दिलेली आहे.
शिवाय ही संस्था कोणत्याही शर्ती अटींचे पालन करीत नाही या प्रकरणाची चौकशी करून या संस्थेला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनाच्या प्रती वरिष्ठाना पाठवण्यात आल्या आहेत.






