Home धाराशिव तहसील कार्यालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

तहसील कार्यालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

687

आशाताई बच्छाव

1001484297.jpg

तहसील कार्यालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी उमरगा प्रतिनिधी: उमरगा तहसील कार्यालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.सविस्तर वृत्त असे की, उमरगा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, निराधार, वेगवेगळ्या प्रकारचे अनेक कामे तहसील कार्यालयाशी संलग्न असल्याने अनेक वेळा हेलपाटे मारावे लागतात.परंतु उमरगा तहसील कार्यालयातील कामचुकार कर्मचारी लेटलतिफ आणि शासनाने घातलेल्या नियमांचे पालन करत नाहीत.उलट कार्यालयात येऊन काही कर्मचारी फक्त सही करून जातात.तर काल दि ७/५/२५ रोजी छावा संघटनेच्या वतीने स्पाॅटपंचना केला.यामध्येआस्थापना विभाग,लेखा विभाग -युवराज शिंदे,नायब तहसीलदार महसूल -भिमाशंकर बेरूळे, नायब तहसीलदार भारती, नैसर्गिक आपत्ती -कदम मॅडम, संजय गांधी योजना -ठाकूर मॅडम, निवडणूक विभाग, भुकंप पुनर्वसन -मुळे मॅडम, शिपाई गायकवाड बाई, पोतदार बाई, अनुपस्थित होते.हे वरील कर्मचारी शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकाची खिल्ली उडवत आहेत.ही बाब अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने तहसीलदार श्री येरमे यांच्या निदर्शनास आणून दिली. आज दि.८/५/२५ रोजी निवेदन देऊन स्थानिक कर्मचारी याचा दूरूपयोग करत आहेत.अशा कर्मचाऱ्यांना जवळचे २जिल्हे सोडून बदली करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने, सामाजिक कार्यकर्ते युवराज गायकवाड आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.चार दिवसांत कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

Previous articleअतनूर येथे सप्ताहाची सांगता
Next articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व दैनिक माझा मराठवाडा विदर्भ विभागीय संपादक संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.