आशाताई बच्छाव
साकोली येथे संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम १२ मे रोजी
बुद्ध पौर्णिमेचे औचित्य -भीम सेनेचा उपक्रम
संजीव भांबोरे
भंडारा –साकोली येथेबुध्द पौर्णिमेच्या मंगल पर्वावर स्वातंत्र, समता, न्याय आणि करूणा प्रदान करणाऱ्या बुध्द धम्माचा आणि आंबेडकरी विचारांचा प्रसार प्रचार व्हावा असा मनाशी उद्देश बाळगुण स्वाभिमानी सामाजिक संघटना भीम सेनेच्या वतीने दि.१२ मे २०२५ रोजी सायं.६ वाजता होमगार्ड परेड ग्राऊंड साकोली येथे भीमक्रांतीचा बुलंद आवाज राष्ट्रीय प्रबोधनकार संविधान मनोहरे, अमरावती यांच्या संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे (कव्वाली) आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटक म्हणून आ. नाना पटोले तर अध्यक्षस्थानी
खा. प्रशांत पडोळे असतील. अतिथी म्हणून इंजि. नरेश गणविर, राहुल (छोटु) राऊत, ओम गायकवाड, सचिन गजभिये, सुमित शहारे, समाजकल्याण सभापती शितल राऊत, होमराज कापगते, अश्विन नशिने, ग्यानिराम गोबाडे,अमोल हलमारे, गिरीश रहांगडाले, विजू दुबे, संदिप बावनकुळे, राजेश सुर्यवंशी, दिपक वानखेडे, प्रविण भांडारकर,पी. एम. कोटांगले,उमेश कठाने, रवि परशुरामकर, अशोक कापगते, आशिष मारवाडे, रूपचंद टेंभुर्णे, नंदू गेडाम, गोलू धुर्वे, रिषभ तांडे, पंकज वासनिक आदी मान्यवर उपस्थित राहतील.
कार्यक्रमासाठी छत्रपती गृप, साकोली, सक्षम फाउंडेशन, साकोली व हजरत बाबा भाई साहब उर्स कमेटी, साकोली यांचा सहयोग असून जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.






