Home बुलढाणा ‘राहुल पाणी चला जायेगा !’ – नळा ऐवजी डोळ्यातून पाण्याचे थेंब येण्याची...

‘राहुल पाणी चला जायेगा !’ – नळा ऐवजी डोळ्यातून पाण्याचे थेंब येण्याची वेळ ! – येळगाव धरणात 40 टक्के जलसाठा शिल्लक ! – जिल्ह्यातील लघू प्रकल्पाचा जलस्तर खालावला, 38 टँकरने पाणीपुरवठा !

96

आशाताई बच्छाव

1001480926.jpg

‘राहुल पाणी चला जायेगा !’ – नळा ऐवजी डोळ्यातून पाण्याचे थेंब येण्याची वेळ ! – येळगाव धरणात 40 टक्के जलसाठा शिल्लक ! – जिल्ह्यातील लघू प्रकल्पाचा जलस्तर खालावला, 38 टँकरने पाणीपुरवठा !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलडाणा उन्हाचे चटके तीव्र होऊ लागल्याने याचा जिल्ह्यातील जल स्त्रोतांवर परिणाम दिसून येत आहे. लघु प्रकल्पातील जलपातळी खालावत चालल्यामुळे अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात सध्या 38 ते 40 टक्के पाणीसाठा शिल्लक असून, नगर पालिकेद्वारे पाणीपुरवठा नियमित होत नसल्याचा आरोप तत्पूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. दरम्यान जिल्ह्यात 38 टँकरने पाणीपुरवठा केला जात असुन उपाययोजनांची गरज आहे.
प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अंतर्गत जिल्ह्यातील बहुतांश गावांना पाणी पुरविल्या जाते. मोठ्या व मध्यम धरणात सध्या समाधानकारक जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मे महिन्यापर्यंत पाणी राहण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. मात्र लघु प्रकल्पांमध्ये जलपातळी खालवल्याने पाणी प्रश्न बिकट होत आहे. परिणामी उपाय योजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक ठरत आहे. जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पाणी टंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत काही कामे पूर्णत्वास गेली असून, जिल्ह्यात 38 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच ज्या
गावात भीषण पाणी टंचाई आहे तेथे विहीर, बोअरवेल अधिग्रहण करून पाणी पुरवठा केला जात आहे.

जलप्रकल्पांवर दृष्टीक्षेप..

खडकपूर्णाची एकुण क्षमता 160.61 असून सध्या 59.67 इतका साठा आहे. नळगंगा प्रकल्पाची क्षमता 71.86 असून यामध्ये 39.59 साठा आहे. पेनटाकळी प्रकल्पाची क्षमता 67.86 असून यामध्ये 28.6 एवढा जलसाठा आहे.

Previous articleसावखेड तेजन येथील शेतकऱ्याच्या जनावरांवर वीज कोसळून मृत्य
Next articleवादळी वाऱ्याचा पहिला फटका बुलढाणा शहरात !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.