Home पुणे कासारवाडीत भव्य शिव स्मारक प्रकल्पाचे भूमिपूजन माजी नगरसेवक शाम लांडे यांच्या प्रयत्नातून...

कासारवाडीत भव्य शिव स्मारक प्रकल्पाचे भूमिपूजन माजी नगरसेवक शाम लांडे यांच्या प्रयत्नातून साकारणार भव्य राजमाता जिजाऊ व बाल शिवराय शिल्प स्मारक प्रकल्प

463

आशाताई बच्छाव

1001470908.jpg

कासारवाडीत भव्य शिव स्मारक प्रकल्पाचे भूमिपूजन
माजी नगरसेवक शाम लांडे यांच्या प्रयत्नातून साकारणार भव्य राजमाता जिजाऊ व बाल शिवराय शिल्प स्मारक प्रकल्प
पुणे : प्रतिनिधी ब्युरो चीफ उमेश पाटील
पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी येथील महानगरपालिकेच्या शाळेच्या प्रांगणात भव्य शिवस्मारक उभारण्यात येत आहे. यामध्ये राजमाता जिजाऊ व बाल शिवराय यांचा पुतळा समाविष्ट आहे. संपूर्ण देशाचे आराध्य दैवत, ऊर्जा स्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज व त्यांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा प्रभाव आजच्या तरुण पिढीवर असणे आवश्यक आहे. या उद्देशाने कासारवाडी येथील महानगरपालिकेच्या शाळेच्या आवारात बाल शिवाजी व राजमाता जिजाऊ यांचे स्मारक उभारण्यात येत आहे.
सदर प्रकल्पासाठी ३ कोटी ९२ लाख निधीची महानगरपालिकेकडून तरतूद करण्यात आलेली आहे. महानगरपालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्थापत्य विभागाच्या मार्फत हा प्रकल्प राबवला जात आहे.
स्मारकाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी नगरसेवक दत्तात्रय लांडगे, माजी स्थायी समिती सदस्य शाम लांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
असा असेल शिवस्मारक प्रकल्प
स्मारकाची उंची ६ फूट एवढी असून मेघडंबरीची उंची १५ फूट इतकी आहे शिल्प चौथरा अष्टकोनी असून यामध्ये शिल्पाच्या मागील बाजूस संस्कारसृष्टी उभारली जाणार आहे. यामध्ये राजमाता जिजाऊ या बाल शिवरायांवर संस्कार करताना शिल्प प्रतिकृती साकारण्यात येणार आहेत. आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. हे शिल्प शिल्पकार मिलिंद किर्दत घडवत आहेत.
सदर कार्यक्रमाचे आयोजन अखिल एक गाव एक शिवजयंती समिती व माजी नगरसेवक श्याम लांडे मित्रपरिवार यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी उस्ताद बाळासाहेब लांडगे, माजी नगरसेवक रामभाऊ पिंपळे, ज्ञानेश्वर थोरात, रतन लांडगे, रवी लांडगे, सुनील लांडगे, अमोल मोटे, अशोक पगारिया, विलास पगारिया, रमेश लांडगे, तुकाराम जवळकर, बापू भोसले, ज्ञानेश्वर लांडे, सहादु भालेकर, रोहिदास चव्हाण, वसंत बोरा, लघुउद्योजक संघटना अध्यक्ष संदीप बेलसरे सलीम तनवर, अतुल दौंडकर, रुपेश चव्हाण, स्वप्निल चौधरी, विकी मस्के, चेतन मेस्ता, गणेश लांडे दत्ता पवार, सोमेश्वर जौंजाळ, ज्ञानेश्वर कवडे, दादासाहेब रसाळ आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
कोट १ :
राजमाता जिजाऊंचे संस्कार प्रत्येक कुटुंबातील मुलावर व्हावेत या विचारानुसार प्रेरित होऊन विद्यार्थी घडावेत यासाठीच शालेय आवारात या शिल्पाचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न होत आहे. डिसेंबर अखेर स्मारकाचे कामकाज पूर्ण करून १२ जानेवारी रोजी जिजाऊ जयंती साजरी करण्याचा मानस आहे.
शाम लांडे, माजी नगरसेवक
कोट २ :
पिंपरी चिंचवड शहरातील हा ऐतिहासिक प्रकल्प राबविण्यात येत आहे. सर्वांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचे स्मारक येथे उभारले जात आहे. याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे.
योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

Previous articleसतिश घरडे यांची भंडारा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती – जिल्ह्यासाठी सन्मानाची बाब
Next articleचौंडीला जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीत बदल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.