Home उतर महाराष्ट्र चौंडीला जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीत बदल

चौंडीला जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीत बदल

120

आशाताई बच्छाव

1001470923.jpg

अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे- चौंडीला जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीत बदल
चौंडी (ता. जामखेड) येथे मंगळवारी (ता. ६) राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील सर्व मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे तेथे होणारी गर्दी पाहता पोलीस प्रशासनाने चौंडीला जाणाऱ्या वाहतुकीत मंगळवारी (ता. ६) पहाटेच्या प्रारंभापासून रात्री ८ वाजेपर्यंत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाहतुकीतील बदल
हाळगाव – चौंडी मार्गे – चापडगावकडे जाणाऱ्या वाहतुकीचा मार्ग –
हाळगाव – पिंपरखेड – गिरवली (ता. जामखेड) – मलठण (ता. कर्जत) मार्गे – चापडगाव
पिंपरखेड – चौंडी मार्गे – चापडगावकडे जाणाऱ्या वाहतुकीचा मार्ग –
पिंपरखेड – गिरवली (ता. जामखेड) – मलठण (ता. कर्जत) मार्गे – चापडगाव
गिरवली (ता. जामखेड) – चौंडी मार्गे – चापडगावकडे जाणाऱ्या वाहतुकीचा मार्ग –
गिरवली (ता. जामखेड) – मलठण (ता. कर्जत) मार्गे – निमगाव डाकू – चापडगाव चापडगाव (ता. कर्जत) – चौंडी मार्गे – गिरवली (ता. जामखेड)कडे जाणाऱ्या वाहतुकीचा मार्ग –
चापडगाव (ता. कर्जत) – निमगाव डाकू – मलठण (ता. कर्जत) – गिरवली (ता. जामखेड) – जामखेड
हा आदेश शासकीय वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन पथक, मंत्री परिषदेला येणारी वाहने व स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही.