Home भंडारा 1 मे महाराष्ट्र व कामगार दिनी राज्यभरातील बँक मित्र व बँक सखी...

1 मे महाराष्ट्र व कामगार दिनी राज्यभरातील बँक मित्र व बँक सखी यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सुरू

251

आशाताई बच्छाव

1001461426.jpg

1 मे महाराष्ट्र व कामगार दिनी राज्यभरातील बँक मित्र व बँक सखी
यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सुरू

जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे व खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांना दिले निवेदन

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी सुद्धा धरणे आंदोलनाला दिला पाठिंबा

संजीव भांबोरे
भंडारा- १ मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनी भंडारा जिल्ह्यातील बँक मित्र आणि बँक सखी सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी करिता आज दिनांक ,1 मे 2025 ला महाराष्ट्र व कामगार दिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण , दीप प्रज्वलित व त्यांना अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्रिमूर्ती चौक भंडारा येथे सकाळी 8 वाजता धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आले .यावेळी संघटनेच्या वतीने भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी बँक मित्र व बँक सखी यांच्या प्रश्नाकडे तात्काळ लक्ष घालण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिली. या उपोषण मंडपाला भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी सुद्धा धरणे आंदोलनाला भेट देऊन आपल्या मागण्यांच्या पाठपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन त्यांना दिले. तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून त्यांच्या समस्येकडे शासनाने तात्काळ लक्ष देऊन समस्या निकाली काढण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशन तर्फे करण्यात आलेल्या आवाहनानुसार या धरणे कार्यक्रमाचे आयोजन राज्यात सर्वत्र करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बँक मित्रांची संख्या वीस हजारावर आहे. ज्यांना आज कुठल्याही सेवाशर्ती नाहीत. बँका कॉर्पोरेट कंत्राटदार नेमतात ते नंतर व्यक्तींना कंत्राटी पद्धतीवर अत्यल्प कमिशन देऊन त्यांच्याकडून नवीन खाती उघडणे, डिपॉझिट स्वीकारणे, पेमेंट देणे, विविध सरकारी योजनांची अंमलबजावणी ही आणि यासारखी बँकिंग सेवेशी संबंधित अनेक महत्वाची कामे त्यांच्याकडून अत्यल्प मेहनतान्यावर करून घेतली जातात. या बँक मित्रांना निश्चित अशा सेवाशर्ती लागू करण्यात याव्यात, मध्यस्थ कंपनीला दूर सारावे, योग्य दराने कमिशन देण्यात यावे, सेवा देण्यासाठी करण्यात येणारा खर्च बँकेकडून देण्यात यावा, इत्यादी मागण्यांचे निवेदन भंडारा जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा पोलीस अधीक्षक नूरल हसन भंडारा, संदीप माकडे तहसीलदार साहेब भंडारा ,यांना देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता भंडारा जिल्हा अध्यक्ष दिनेश आजबले, व्यंकटराव खंडाईत, आशिष कुमार घाडगे, कोमल कापगते, मनोज भुरले ,रवीना खोब्रागडे ,नरेश राऊत ,जागेश्वर निखारे, शितल धांडे ,निकिता वंजारी आशा बोरकर ,राकेश लोथे यांनी सहकार्य केले.