आशाताई बच्छाव
विविध शाखांमध्ये बँक व्यवस्थापकाकडून खातेदारांना अपमानास्पद वागणूक !
बी.जी.शिंदे / प्रतिनिधी
तालुक्यात व उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघातील विविध राष्ट्रीयकृत बँक, भारतीय स्टेट बँक, बॅक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, नाबार्ड बँक, विविध सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था, बुलढाणा बँक, को-ऑपरेटिव सहकारी पतसंस्था, सोसायटी, बँक ऑफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, आय.सी.आय.सी.बँक सह राष्ट्रीयकृत बँकेचे, सहकारी बँका, सहकारी पतसंस्थाच्या शाखा उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्रत्येकी विविध बँक शाखेत वीस ते पंचवीस गावे या बँकेला जोडलेले आहेत. या गावांमधील अनेक नागरिकांचे खाते विविध बँक शाखा व येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, सेंट्रल बँक, बॅक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात खातेधारकाची गर्दी पाहायला मिळते. या बँक खाते मध्ये श्रावण बाळ योजना, निराधार योजना तसेच शासनाच्या अनेक योजनांचे पैसे या बँकेमध्ये येत असतात. त्यामुळे येथे ग्राहकांची गर्दी असते. परंतु विविध सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, राष्ट्रीयकृत बँक, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, सेंट्रल बँक येथील शाखा व्यवस्थापक, शाखाधिकारी, खजिनदार, लेखापाल, वरिष्ठ लिपिक यांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे येथील खातेदार कंटाळलेले आहेत.
एकाच कामासाठी खातेधारकांना बँकेच्या अनेक चकरा माराव्या लागतात. ह्या सर्व विविध सहकारी बँका व राष्ट्रीय कृत्य बॅक शाखा व येथील खातेदाराक हे ग्रामीण भागातील असल्यामुळे त्यांना बँकेचे अनेक फार्म व कामे समजत नसल्यामुळे ते शाखा व्यवस्थापकाला विचार ना करण्याकरता जात असतात. परंतु येथील शाखा व्यवस्थापक त्यांना तुम्हाला समजत नाही, तर बँकेत येता कशाला अशा प्रकारचे वागणूक देत असतात. त्यासोबत बँक व्यवस्थापक त्यांना उडवा उडवी चे उत्तरे देत असतात. आणि असे सांगतात की आमच्याकडे भरपूर कामे आहेत. तुम्हाला जर फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही दोन दिवसांनी किंवा तीन दिवसांनी पुन्हा या असे सांगत असतात. आत्ता सध्या उन्हाळा सुरू असून तापमानाने ऊचांक गाठलेला आहे. अशा भर उन्हात खातेदारकांना एकाच कामासाठी वारंवार येणे परवडत नाही. एवढंच नाही
तर हे खातेधारक ग्रामीण भागातील असून ते आपले मजुरी सोडून बँकेत येत असतात. परंतु त्यांना समाधानकारक शाखा व्यवस्थापकाकडून वागणूक मिळत नसल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. एवढेच नाही तर येथील भारतीय स्टेट बँक च्या बाजूला अगदी लागून घाणीचे साम्राज्य साकारलेल्या आहेत. याकडे सुद्धा बँक व्यवस्थापकाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. या सर्व बाबींकडे भारतीय स्टेट बँक च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन अशा बँक व्यवस्थापकावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी अनेक खातेदारांनी केली. व खातेदारांना होणारा मानसिक त्रास कमी करण्यात यावा अशी मागणी होत आहे.






