Home बुलढाणा मोबाईलच्या हट्टापायी गमावला जीव ! रागाच्या भरात उचलले मूलाने टोकाचे पाऊल !

मोबाईलच्या हट्टापायी गमावला जीव ! रागाच्या भरात उचलले मूलाने टोकाचे पाऊल !

110

आशाताई बच्छाव

1001444951.jpg

मोबाईलच्या हट्टापायी गमावला जीव ! रागाच्या भरात उचलले मूलाने टोकाचे पाऊल !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा:- देऊळगाव राजा रागाच्या भरात आजकालची पिढी काय करेल सांगता येत नाही. वडिलांनी मोबाईल हिसकावून घेतल्याने एका 17 वर्षीय मुलाने घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील जवळखेड येथे ही घटना घडली.
देऊळगाव राजा तालुक्यातील अनिकेत तुळशीदास अवघडराव (17 हा नुकतीच बोर्डाची परीक्षा पास करून तो 11 व्या वर्गात महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. 23 एप्रिल रोजी दुपारी वडिलांनी हातातील मोबाईल हिसकावला त्यामुळे वडिलांनी हातातील मोबाईल हिसकावला याचा मनात राग धरून अनिकेत याने रागाच्याभरात घरातील छताला गळफास लावून जीवन संपवले. सदर घटना सायंकाळी 5 वाजे सुमारास उघडकीस आली. नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात अनिकेतला दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस पुढील तपास करीत आहे.

Previous articleकिन्होळा येथे एकाला क्षुल्लक कारणावरून मारहाण ! – तिघांविरुद्ध -गुन्हा दाखल !
Next articleपेहेलगाम येथील अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या दोंडाईचा शहर तर्फे कैंडल मार्च काढून निषेध
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.