Home कोल्हापूर श्री भगवान परशुराम जन्मोत्सव ,शिवजयंती यंदा साधेपणाने

श्री भगवान परशुराम जन्मोत्सव ,शिवजयंती यंदा साधेपणाने

117

आशाताई बच्छाव

1001444810.jpg

 

श्री भगवान परशुराम जन्मोत्सव ,शिवजयंती यंदा साधेपणाने

कोल्हापूर अविनाश शेलार ब्युरो चीफ –ब्राह्मण सभा करवीर (मंगलधाम ), कोल्हापूर चित्पावन संघ , कऱ्हाडे ब्राह्मण संघ तसेच सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने दरवर्षी त्रेतायुगादी दैवत भगवान श्री परशुराम यांचा जन्मोत्सव सोहळा आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते . यावर्षीही समाजाच्या वतीने या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती . परंतु काश्मीर पहलगाम येथे आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला . त्यामुळे सध्या संपूर्ण देश आणि देशवासीय दुःखामध्ये आणि आक्रोशात आहेत . या मृत झालेल्या आपल्या बांधवांच्याबद्दल सर्व समाजाच्या वतीने आम्ही श्रद्धांजली अर्पण करत आहोत . तसेच केंद्र सरकारकडे मागणी करत आहोत की या हल्ल्यातील दोषींवरती त्वरित कडक कारवाई करून मृतांच्या नातेवाईकांना न्याय द्यावा . अशा प्रसंगामध्ये परशुराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त साजरा करण्यात येणारा भव्य कार्यक्रम करणे हे उचित वाटत नाही . म्हणूनच यंदा आम्ही मंगळवार दिनांक २९ रोजी सायंकाळी ५. ३० वाजता भगवान परशुराम आणि छत्रपती शिवरायांचा पालखी सोहळा साधेपणाने करणार आहोत . नेहमी पेटाळा मैदानावरती होणारा कार्यक्रम यावर्षी बिनखांबी गणेश मंदिर येथील मंगलधाम येथे समाज बांधव भगिनींच्या उपस्थितीत साधेपणाने होईल . या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हा ब्राह्मण संघाबरोबरच सारस्वत विकास मंडळ , ब्राह्मण पुरोहित संघ ,परशुराम चषक क्रिकेट स्पर्धा कमिटी, बीबीएफ पालखीमंडळ तसेच वी फॉर अवर्स युवा ग्रुप चे सर्व पदाधिकारी सदस्य कार्यरत आहेत . अशी माहिती डॉ . उदय कुलकर्णी , श्रीकांत लिमये , मकरंद करंदीकर , प्रसाद भिडे , धर्मराज पंडित , मिलिंद पावनगडकर , विनिता आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली

*वर्षभर विविध उपक्रम
सकल ब्राह्मण समाजातील विविध जाती पोट जाती संस्था संघटनांच्या माध्यमातून वर्षभर धार्मिक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात . अगदी समाजातील मौजी बंधन , संक्रांती कालावधीतील धुंदूरमास , चित्पावन अष्टमी जागर सोहळा अशा धार्मिक सोहळ्यांबरोबरच व्याख्याने , संगीत मैफल , पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण , महिलाविषयक कार्यशाळा , आर्थिक साक्षरतेसाठी कार्यशाळा असे उपक्रम राबवले जातात . विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील बंधू-भगिनींबरोबरच विद्यार्थी गुणगौरव सोहळा दरवर्षी साजरा केला जातो .

 

 

 

Previous articleभोकरदन येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात सुरू असलेले गुरुचरित्र पारायणाची आज सांगता
Next articleदेगलूर तालुक्यातील ९० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.