Home नांदेड देगलूर तालुक्यातील ९० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

देगलूर तालुक्यातील ९० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

150

आशाताई बच्छाव

1001444830.jpg

देगलूर तालुक्यातील ९० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड देगलूर –ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण सोडतीतून गाव,वाड्या व तांड्यांतील मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडती शुक्रवारी (२५ एप्रिल) पंचायत समितीच्या सभागृहात पार पडल्या. या सोडतीतून “कहीं खुशी, कहीं गम” असे संमिश्र चित्र पाहायला मिळाले.
२०२५-३० कालावधीसाठी आरक्षण निश्चितया सोडतीतून देगलूर तालुक्यातील एकूण ९० ग्रामपंचायतींसाठी २०२५ ते २०३० या पाच वर्षांच्या कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले.
प्रत्येक गावातील तहसीलदारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोडतीदरम्यान अनेक इच्छुक उमेदवार उपस्थित होते. काहींना आरक्षणामुळे अपेक्षेप्रमाणे संधी मिळाली, तर काहींच्या आशांवर विरजण पडले.
——————————————-
राजकीय दृष्टिकोनातून संवेदनशील गावांमध्ये विशेष लक्ष
तालुक्यातील काही राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गावांमध्ये आरक्षण कोणाला लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. काहीजणांनी समाधानाचा सुस्कारा सोडला, तर काहींच्या चेहऱ्यावर निराशा झळकली.
———————————————–
आरक्षण सोडती शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते पारपडली ही सोडत साई गणेश पोकलवार आणि सजफा वाजीद पठाण (तिसरी वर्ग) या विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली. तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी आरक्षण जाहीर केले.यावेळी उपजिल्हाधिकारी व संनियंत्रण अधिकारी अनुप पाटील, नायब तहसीलदार गिरीष सरकुलवार, महसूल अधिकारी व इतर विविध विभागांचे अधिकारी तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————

आरक्षण निहाय ग्रामपंचायतींची यादी (महत्वाच्या गटानुसार)

अनुसूचित जाती (पुरुष):
करडखेड, कोटेकल्लूर, तुपशेळगाव, बल्लूर, बोरगाव, मनसक्करगा, इत्यादी.

अनुसूचित जाती (महिला):
आचेगाव, चाकुर, देवापूर, भक्तापूर, मुजळगा, वझरगा, सांगवी करडखेड, इत्यादी.

अनुसूचित जमाती (पुरुष):
येरगी, वळग.

अनुसूचित जमाती (महिला):
करेमलकापूर, कावळगड्डा, कावळगाव.

मागासवर्ग (पुरुष):
कुतुबशहापूरवाडी, चैनपूर, टाकळी (ज), नंदूर, मरतोळी, इत्यादी.

मागासवर्ग (महिला):
आलूर, कोकलगाव, तडखेल, मंडगी, शेळगाव, इत्यादी.

सर्वसाधारण (पुरुष):
अंबुलगा, कुडली, केदारकुंठा, खानापूर, शिवणी, हावरगा, इत्यादी.

सर्वसाधारण (महिला):
अंतापूर, आमदापूर, गवंडगाव, दरेगाव, भुतनहिप्परगा, माळेगाव, येडूर, इत्यादी.

———————————————–
महिलांना ४७ ग्रामपंचायतींमध्ये संधी
या आरक्षण प्रक्रियेमुळे एकूण ४७ ग्रामपंचायतींमध्ये महिलांना सरपंचपदाची संधी मिळणार असून महिला नेतृत्वाला मोठे प्रोत्साहन मिळाले आहे.

———————————————–
आरक्षण प्रक्रियेने ग्रामीण भागातील नेतृत्व बदलाची दिशा निश्चित केली आहे. काहींसाठी ही प्रक्रिया संधीची दारे उघडणारी ठरली, तर काहींसाठी पुढील वेळेची वाट पाहण्याची गरज आहे. ग्रामपंचायतीतील आरक्षण हा लोकशाहीचा एक महत्त्वाचा टप्पा असून याचा सामाजिक समावेशाच्या दिशेने मोठा वाटा आहे.

Previous articleश्री भगवान परशुराम जन्मोत्सव ,शिवजयंती यंदा साधेपणाने
Next articleउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन व स्वागत.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.