आशाताई बच्छाव
भोकरदन येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात सुरू असलेले गुरुचरित्र पारायणाची आज सांगता
भोकरदन प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे
भोकरदन येथील स्वामी समर्थ केंद्रामध्ये सुरू असलेल्या गुरुचरित्र परायणाची आज सांगता होणार आहे या गुरुचरित्र पारायणाला भोकरदन तालुक्यातूनच नव्हे आज बाजूच्या खेड्यातील इतर जिल्ह्यातून या ठिकाणी भाविकांनी येऊन या गुरुचरित्र पारायण सोहळ्यामध्ये भाग घेतला आहे व गुरुचरित्राचे पठण केले आहे रविवारपासून सुरू झालेला गुरुचरित्र पारायण सोहळा आज शनिवार रोजी समाप्त होणार आहे या पारायण सोहळ्याच्या निमित्ताने सकाळी तीन वाजेपासून या ठिकाणी भाविक येतात सर्वप्रथम औदुंबर प्रदक्षिणा करून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन पुढील कार्यास भोकरदन येथील स्वामी समर्थ केंद्राची गुरुवर्य स्वतः भाविकांना मार्गदर्शन करतात व त्यांच्या करवी गुरु मंत्र तसेच श्लोक तसेच जप करून घेतात त्यानंतर सर्व पारायणाला बसलेली भाविक आपापल्या ठिकाणी बसून गुरुचरित्र वाचनास सुरुवात करतात एक सप्ताह चालत असलेल्या या गुरुचरित्र पारायणामध्ये दररोज वेगवेगळे अध्याय पूर्ण करून घेतले जातात सप्ताह मध्यान श्री खंडेराया यांच्या नावाने सुद्धा एक मोठा कार्यक्रम व खंडेरायाचे पूजन केले जाते शेवटपर्यंत पूर्ण 23 अध्याय पूर्ण करून या गुरुचरित्र पारायण सोहळ्याची सांगता होती पूर्ण अध्यायाचे पठण झाल्यानंतर सर्व भाविक महाअर्थीचा लाभ घेतात पूर्ण सात दिवस चालणारा हा सोहळा त्याची आज या ठिकाणी सांगता होणार आहे सर्व भाविक भक्तांसाठी व येणाऱ्या सर्वांसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रसाद म्हणून भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे या सोहळ्याचा दरवर्षी हजारो वारकरी हजारो भक्त या प्रसादाचा लाभ घेत असतात गावातील तसेच आजूबाजूच्या खेड्यातील श्री स्वामी समर्थ भक्त या ठिकाणी आपली आवर्जून सेवा देतात माझा स्वतःचा अनुभव सांगायचा झाल्यास मी गजेंद्र लोखंडे मला या पारायण सोहळ्याला मनापासून बसण्यासाठी इच्छा झाली होती परंतु काही कारणास्तव मला योग आला नव्हता परंतु गुरुचरित्र पारायण सोहळ्याच्या निमित्ताने शेवटचे 10 ते 12 अध्याय वाचनाचा योग मला आला आणि खऱ्या अर्थाने मला गुरु माऊलीचा आशीर्वाद मिळाल्याचा मला आनंद झाला खरं गुरुमाऊलीची भक्ती ही अपरंपार आहे गुरुचरित्र पारायण सोहळ्याच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ भक्तीत लिहीन होईल अशा भक्तांची कधीही कल्याण झाल्याशिवाय राहत नाही स्वामी समर्थ महाराज यांच्या समोर नतमस्तक होऊन आपली इच्छा व्यक्त केल्यास इच्छा पूर्ण झाल्याचा अनुभव मला आलेला आहे युवा मराठा न्युज नेटवर्क रिपोर्टर गजेंद्र लोखंडे भोकरदन






