आशाताई बच्छाव
आशाताई पांडे यांच्या प्रयत्नांना यश सिल्लोड आव्हाना वाकडी कुकडी मार्गे पिंपळगाव बस सेवा सुरू
भोकरदन तालुका प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे
भारतीय जनता पार्टीच्या महिला माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई पांडे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून सिल्लोड व्हाय आव्हाना मार्गे बस सेवा सुरू करण्यात यावी यासाठी कार्यकर्त्याच्या वतीने आशाताई पांडे यांना विनंती करण्यात आली होती सिल्लोड वरून आव्हाना वाकडी कोकडी जळगाव सपकाळ एपिसोडे मार्गे पिंपळगाव रेणुकाई बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती आशाताई पांडे यांनी सदरील कार्यकर्त्याच्या मागणीचा विचार करून एसटी महामंडळाचे मुख्य अधिकारी यांच्याशी संपर्क करून व पत्राद्वारे बस सेवा सुरू करण्याची विनंती केली होती त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून आज दिनांक 25 रोजी बस सेवाला प्रारंभ झालेला आहे आज सकाळी सिल्लोड इथून बस आव्हाना या ठिकाणी आल्यानंतर आव्हाना गावी बसचे स्वागत करताना आशाताई पांडे ईश्वर रामलाल पांढरे धनगर समाज संघर्ष विभागीय अध्यक्ष व बागवान प्रमोद गावंडे भानुदास सरोदे इतर हजारो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते यांनी आव्हाना या गावात बस चे आगमन होतास आशाताई पांडे यांच्या हस्ते बसला हार अर्पण करून स्वागत केले व तसेच महिलांच्या वतीने आशाताई पांडे यांचे स्वागत करण्यात आले सत्कार वेळी बोलताना गावातील इतर समस्या बाबत चर्चा करण्यात आली व त्या समस्याचे निराकरण लवकरच करण्यात येईल व सोडवण्यात येईल अशी आश्वासन अशा ताई पांडे यांनी दिले ही बस सेवा सुरू करण्यासाठी भोकरदन जाफराबाद विधानसभेचे आमदार संतोष भाऊ दानवे यांच्याकडे व आशाताई पांडे यांच्याकडे धनगर संघर्ष समाज संघटनेचे विभागीय अध्यक्ष ईश्वर रामलाल पांढरे यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले असून यामध्ये त्यांचासुद्धा खारीचा वाटा असल्याची नागरिकाच्या वतीने बोलले जात आहे यावेळी गाडीचे पूजन करून पुढील गावासाठी बस मार्गस्थ करण्यात आली व गावकऱ्यांच्या वतीने आशाताई पांडे यांचे धन्यवाद व आभार व्यक्त करण्यात आले






