Home भंडारा प्रकल्पग्रस्तांची अवस्था तळ्यात मळ्यात प्रकल्पग्रस्तांनी भंडारा नागपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या वैनगंगा नदीवर केले...

प्रकल्पग्रस्तांची अवस्था तळ्यात मळ्यात प्रकल्पग्रस्तांनी भंडारा नागपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या वैनगंगा नदीवर केले ठिय्या आंदोलन

105

आशाताई बच्छाव

1001437855.jpg

37 वर्षानंतरही प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जैसे थे

प्रकल्पग्रस्तांची अवस्था तळ्यात मळ्यात

प्रकल्पग्रस्तांनी भंडारा नागपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या वैनगंगा नदीवर केले ठिय्या आंदोलन

विभागीय आयुक्त येणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

खासदार डॉ. प्रदीप पडोळे यांनी घेतली टोकाची भूमिका

भाऊ कातोरे यांनी वैनगंगा नदीत आत्मदहन करण्याचा केला प्रयत्न,पोलिसांची उडाली तारांबळ

संजीव भांबोरे
नागपूर –आज दिनांक 22 एप्रिल 2025 ला गोसेखुर्द प्रकल्पाला 37 वर्षे पूर्ण होत आहे. परंतु 37 वर्षानंतरही प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत .त्याकरिता आज प्रकल्पग्रस्तांनी भंडारा ते नागपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या वैनगंगा नदीवर ठिय्या आंदोलन करण्यात करण्यात आले. आजही प्रकल्पग्रस्तांची परिस्थिती तळ्यात मळ्यात असून आजपर्यंत प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालेला नाही .यावेळी प्रकल्पग्रस्त अशासकीय समितीचे सदस्य भाऊ कातोरे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला .परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना आत्महत्या पासून दूर राहावे लागले. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी जोपर्यंत आंदोलन स्थळी विभागीय आयुक्त येणार नाही ,लेखी आश्वासन देत नाही व बैठकी संबंधात परिपूर्ण चर्चा होत नाही ,तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, 22 एप्रिल 1988 ला गोसेखुर्द धरणाचे भूमिपूजन झाले .आज 36 वर्षाच्या दीर्घकाळ लोटल्यानंतरही धरणाचे काम पूर्ण होऊन सुद्धा प्रकल्पग्रस्त क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झालेले नाही. आणि धरणग्रस्त शेतकरी, शेतमजूर व मच्छीमारांच्या हक्काच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत .शासनाच्या नाकर्ते धोरणामुळे अनेक समस्या प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत निर्माण झालेले आहेत .त्यात प्रामुख्याने धरणग्रस्तांचे दाखले निरस्त करण्यात आले ,पर्यायी शेत जमिनीचा लाभ पूर्णता मिळालेला नाही ,नोकरी ऐवजी एक मुस्तरकमेचा लाभ देताना गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करण्यात आलेला आहे, कलम 18 व 28 (ए )चे प्रकरणे न्यायालयान प्रक्रियेत अडवून ठेवण्यात आलेले आहेत ,पर्यायी गावठाणातील नागरी सुविधा अपूर्ण आहेत पाण्याखाली जाणाऱ्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आलेले नाही ,मौजा नेरला व मौजा सुरबोटी या गावाचे अधिग्रहण करण्यात आले नाही, धरणग्रस्तांना जगण्याचे साधन उपलब्ध करून देण्यात आले नाही ,असे असतानाही गोसेखुर्दरणातील पाण्यावर वैनगंगा -नळगंगा हा 88 हजार कोटीचा नदीजोड प्रकल्प निर्माण करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे, या प्रकल्पाला प्रकल्पग्रस्तांच्या विरोध नाही परंतु त्यांनी प्रथम गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवाव्या त्यानंतरच या प्रकल्पाकडे लक्ष द्यावे यावेळी भंडारा-गोंदिया लोकसभेचे खासदार डॉ .प्रदीप पडोळे ,राम बांते ,अरुण हटवार ,प्रमिला शहारे दिलीप मडामे,सदानंद धारगावे, आकाश भोयर व असंख्य भंडारा व नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा चोक बंदोबस्त होता. बातमी लिहेपर्यंत विभागीय आयुक्त साडेसात वाजेपर्यंत आंदोलन स्थळी येऊ शकले नाही व कोणतेही आश्वासन दिलेले नाही.