आशाताई बच्छाव
वसमत शहरातील फळ व भाजीपाला विक्रीते यांनी तहसीलदारासतहित पोलिस निरीक्षक .मुख्यअधिकारी यांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली
हिंगोली.श्रीहरी अंभोरे पाटील .
वसमत शहर पोलीस स्टेशन ते कारंजा चौक या रोडवरील फळ विक्रेत्यांना व शासकीय विश्रामगृह परभणी रोड कडे जानार्या रस्त्यावरील वाढते अतिक्रमण या मुळे येजा करणार्या वाहन चालक यांना मोठा ट्राफीक जाममुळे मोठा अडथळा निर्माण होत असल्याने वसमत चे तहसीलदार शारदा दळवी व नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांन एका मोकळ्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली होती त्यामुळे भाजीपाला व फळे विक्रते यांनी काहि काळ नेमून दिलेल्या ठिकाणी आपला व्यवसाय सुरू करून शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत चालू झाली होती यामुळे मोकळा श्वास घेत रहदारी सुरळीत चालू झाली होती.
पण काही दिवसांतच फळ व भाजीपाला विक्रेते यांनी मात्र आपली दुकाने परत आपल्या पहिल्याच ठिकाणी थाटली आणी शहरातील मुख्य रस्त्यावर परत मोठा अडथळा निर्माण करत तहसीलदार मॅडम .नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी .शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या आदेशाला नियम बाह्य ठरवत दादागिरी करून केराची टोपली दाखवली या मुळे कायदा व सुव्यवस्था प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे
प्रशासनातील अधिकारी पदाधिकारी यांची जरब लोकांमध्ये दिसून येत नाही त्यामुळेच मागील काही काळामध्ये महसूल प्रशासनातील अधिकारी यांना तलाठी राऊत यांना मोठी जबर मारहाण करून कायदा व सुव्यवस्था बिघडली होती यामुळे सामान्य जनतेच्या मनामध्ये प्रशासनाची वचक दिसून येत नाही .






