आशाताई बच्छाव
माहोरा येथे रेणूकामाता देवीमातेची विधिवत पूजा संपन्न
जाफराबाद तालुका प्रतिनिधी मुरलीधर डहाके
सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे 12 एप्रील शनिवार चैत्र पौर्णिमा या दिवशी सकाळी रेणुका देवी मंदिरामध्ये भाविक भक्तांच्या उपस्थितीत 7 वाजता श्री रेणूका देवीच्या मूर्तीला चांदीचा टोप आणि सोने चांदीच्या दागिने पातळ असा सृंगार करण्यात आला होता. तसेच अभिषेक, जल, दूध, दही यांचे पंचअमृत स्नान करून विधिवत पूजन करुन आणि आरती घेण्यात आली.
या दिवशी गावातली आणि परिसरातील भाविक श्री रेणुका मातेचा उपवास करतात.
तसेच चैत्र पौर्णिमा दिवशी मोठी यात्रा भरते दर्शना साठी जाफराबाद तालुका तसेच जिल्हा भारातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच रेणुका माता मंदिरा समोर रेणूका माता कृपेने अखंड हरिनाम सप्ताह भावार्थ रामायण व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यामध्ये दररोज काकडा, हरिपाठ, पारायण हरी कीर्तन सुरू आहे. दिनांक 12 रोज शनिवार चैत्र पौर्णिमा या दिवशी रात्री 8.30 ते 10.30 वाजेपर्यंत ह.भ.प.श्री मिरगे महाराज यांचे हरी कीर्तन होणार आहे.
दिनांक 13 रविवार या दिवशी ह.भ.प.श्री शाम बोर्डे महाराज यांचे हरी कीर्तन होणार आहे.आणि महाप्रसादाचे आयोजन सुध्दा करण्यात आले आहे . अशा प्रकारे कार्यक्रमांची सांगता होणार आहे.






