आशाताई बच्छाव
साकोलीत १२ एप्रिलला होणार पुतळ्यांचे अनावरण
तीन दिवस चालणार स्मारक भुमी येथे भरगच्च कार्यक्रम
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )साकोली येथील शहरात येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव निमित्त तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा शनि. १२ ते सोम. १४ एप्रिल २०२५ पर्यंत बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरूवात ता. १२ एप्रिल शनिवारी सकाळी ९ ला धम्म ध्वजारोहण पूज्य भदंत डॉ. धम्मरक्षित यांच्या हस्ते, भिक्खु संघास भोजनदान व दु १२ वाजताअनावरण सोहळा संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन भदंत डॉ. धम्मरक्षित नागपूर तर अध्यक्षस्थानी तालुका स्मारक समितीचे अध्यक्ष दिपक साखरे, प्रमुख अतिथी भदंत महेंद्र रतन नागपूर, सभापती शितल राऊत, मदन रामटेके, अभियंता इंजि. नरेश गणवीर, विजय नंदागवळी, अर्चना राऊत, अमित वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होईल. दु. १ ला भिक्खु संघाचे स्वागत, परित्रानपाठ, ३ वा. सत्कार समारंभात सत्कारमूर्ती अमोल टेंभुर्णे, हरिदास रंगारी, सुरेश राऊत, नित्यानंद मेश्राम, कैलास खांडेकर, पी. एस. बोदेले, राहुल राऊत, रुपेश भैसारे, दीपक जांभुळकर, डॉ. किशोर राऊत, राजकुमार रंगारी, शंकर शहारे, भरत दिरबूडे, अजय टेंभुरकर, बी. बी. राऊत, शामराव हुमने, चंदन टेंभुर्णे, विलास बोरकर, अशोक कोटांगले, धर्मदास नंदेश्वर, कौशल्या नंदेश्वर, शिला वासनिक, नंदकुमार राऊत, कुमार रामटेके, एम. जी. राउत, एन. एन. घोडीचोर, आर. एम. अंबादे, ॲड. वामनराव खोब्रागडे, चोपराम राऊत, प्रेमलाल बडोले, ॲड. प्रभाकर बडोले, घनश्याम राऊत, हरिदास शहरे, कल्पना सांगोळे, डी. जी. रंगारी, धीरज वाहने, डॉ. शंकर बागडे, डी. वाय. बडोले, मनोहर टेंभुर्णे, अशोक रंगारी, दिपक साखरे इत्यादी सामाजिक कार्यकर्त्यांचा येथे सत्कार होणार आहे. तर दि. १३ एप्रिलला भीम गीतांचा संगीतमय धम्म प्रबोधन कार्यक्रम सादर करते लॉर्ड बुद्धा म्युझिकल ग्रुप पालांदूर हरिश्चंद्र लाडे व संच आयोजक अमोल टेंभुर्णे, कैलास खांडेकर, दि. १४ एप्रिलला स. ९ वा. ध्वजारोहण, ९.३० वा. सामूहिक बुद्ध वंदना, १० वा. भारतीय संविधान पुस्तकाचे वाटप, माजी मुख्या. पी. एस. बोदेले तसेच तालुका स्मारक समितीचे सदस्य यांच्या वतीने १०.३० वा. पालीभाषा परीक्षा प्रमाणपत्र वाटप व स. ११ वा. अल्पोपहार इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका स्मारक समितीचे अध्यक्ष दिपक साखरे, उपाध्यक्ष अशोक रंगारी, सचिव ॲड. स्मिता मेश्राम, सहसचिव हरी शहारे, नालंदा टेंभुर्णे व इतर सर्व तालुका स्मारक समितीचे सदस्य, पदाधिकारी यांनी केले आहे.






