आशाताई बच्छाव
15 एप्रिल ला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त लवारी येथे तनुजा नागदेवे यांचा संगीतमय भीम गीत कार्यक्रमाचे आयोजन
संजीव भांबोरे
भंडारा –साकोली तालुक्यातील लवारी येथे दिनांक 15 एप्रिल ला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त रात्री 8 वाजता बुद्ध विहार समोरील पटांगणात गायिका तनुजा नागदेवे व सुरेंद्र बनसोड यांच्या भीम गीतांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक पाहुणे म्हणून आमदार नानाभाऊ पटोले, तर प्रमुख अतिथी म्हणून सभापती शितल राऊत ,पंचायत समिती सदस्य अनिल किरणापुरे, नरेश नागरीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते ,हरीश नगरीकर ,इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संघटना कार्यक्रम होणार असून आवाज भीम क्रांतीच्या भीम बुद्ध गीतांचा संगीतमय कार्यक्रम माझा लाभ जास्तीत जास्त जनतेने घ्यावा अशी आव्हान विहाराचे अध्यक्ष चिरंजीव टेंभुर्ण, खेमराज टेंभुर्ण रितेश व इतर कार्यकर्त्यांनी केलेला आहे.






