Home बुलढाणा इम्पॅक्ट ! ‘अशा’ मोठ्या कारवाईचा आठवडा पुन्हा – पुन्हा यावा ! –...

इम्पॅक्ट ! ‘अशा’ मोठ्या कारवाईचा आठवडा पुन्हा – पुन्हा यावा ! – अवैध धंद्यांविरोधात एसपींचा ४४३ आरोपींना दणका! – ‘युवा मराठा ‘ ने केला होता अवैध धंद्याविरुद्ध आवाज बुलंद !

108

आशाताई बच्छाव

1001397916.jpg

इम्पॅक्ट ! ‘अशा’ मोठ्या कारवाईचा आठवडा पुन्हा – पुन्हा यावा ! – अवैध धंद्यांविरोधात एसपींचा ४४३ आरोपींना दणका! – ‘युवा मराठा ‘ ने केला होता अवैध धंद्याविरुद्ध आवाज बुलंद !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा इच्छाशक्ती असली तर, पोलीस गुन्हेगारीचे उच्चाटन करू शकतात, ही काळ्या दगडावरील रेष आहे. ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवले तर एका आठवड्यात जिल्ह्यातील अवैध दारू, वरली मटका, IPL सट्टा आणि इतर
गैरकायदेशीर धंद्यांवर बुलडाणा पोलिसांचा वचक असू शकतो, हे एसपी विश्व पानसरे यांनी दाखवून असू शकता, ह एसपा विश्व पानसर याना दाखवून दिले आहे.३१ मार्च ते ६ एप्रिल २०२५ या कालावधीत अवैध धंद्यांविरोधात ४४३ आरोपींना दणका देत ४३५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील ३३ पोलीस ठाणे अंतर्गत १२ लाख १३ हजार ७७४ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. काही दिवसापूर्वी बुलढाणा जिल्ह्यात अवैध धंद्याचे रान उठले होते. दरम्यान एका भागवत गीरी नामक पोलीस कॉन्स्टेबलचा अवैध धंदे वाल्याने बळी
घेतल्याने हे प्रकरण ‘युवा मराठा ‘ने उचलून धरले होते.
याविरुद्ध आंदोलन व काही नेत्यांनी आवाज बुलंद केला होता. विशेष म्हणजे ‘युवा मराठा ‘ ने याविरुद्ध साडेतोड वृत्त प्रसारित केल्याने अवैध धंदे बंद करण्याचा सपाटा पोलिसांनी सुरू केला हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. दरम्यान या आठवड्यात ४४३ आरोपींना हिसका दाखवून ४३५ गुन्हे दाखल होत असतील तर जिल्ह्यात असा आठवडा पुन्हा पुन्हा यायला हवा अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Previous articleराजस्थान स्वीटमार्टजवळ घडला ‘चमत्कार’; पण गायब झाले सोनं
Next articleपत्रकारांसाठी आरोग्य सुविधा, गृहनिर्माण आणि प्रवास सवलत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.