Home बुलढाणा राजस्थान स्वीटमार्टजवळ घडला ‘चमत्कार’; पण गायब झाले सोनं

राजस्थान स्वीटमार्टजवळ घडला ‘चमत्कार’; पण गायब झाले सोनं

102

आशाताई बच्छाव

1001397901.jpg

राजस्थान स्वीटमार्टजवळ घडला ‘चमत्कार’; पण गायब झाले सोनं
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा संजय पन्हाळकर
बुलडाणा :- बुलडाणा शहरातील आठवडी बाजार लाईनजवळ एका चमत्कारी बाबाच्या नावाखाली 79 वर्षीय निवृत्त शिक्षकाची तब्बल 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार 7 एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. चेतना नगर येथील बंडु चांदु चव्हाण हे लस्सी प्यायला राजस्थानी स्वीटमार्टजवळ गेले असता, एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधला. “सीताराम मंदिर कुठे आहे?” असे विचारून त्याने चव्हाण यांचा विश्वास संपादन केला. स्वतःला चमत्कारी बाबाचे स्वरूप देत त्या व्यक्तीने रुद्राक्षाचा चमत्कार दाखवून चव्हाण यांच्याकडील 12 ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि 100 रुपयांची नोट घेऊन ती रुमालात गुंडाळून देवदर्शनासाठी पाठवले.
चव्हाण मंदिराजवळ पोहोचले, मात्र रुमाल उघडून पाहिल्यावर त्यात ना नोट होती ना अंगठी! फसवणूक लक्षात येताच त्यांनी तात्काळ बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेवरून भारतीय न्याय संहिता कलम 318 (4) अंतर्गत अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकाँ गजानन जाधव करीत आहेत.