Home पुणे बांबू मैन श्री रणजित जी गुळवे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

बांबू मैन श्री रणजित जी गुळवे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

131

आशाताई बच्छाव

1001397432.jpg

दैनिक युवा मराठा न्यूज़ पुणे जिल्हा ब्युरो चीफ श्री प्रशांत नागणे बांबू मैन श्री रणजित जी गुळवे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा नेशनल बांबू मिशन या उपक्रमावर्ती गेली २ वर्षापासून मोठ्या चिकाटीने काम करणारे पर्यावरण रक्षक म्हणून काम करणारे अग्रिहिता ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष रणजित जी गुळवे सरांचा वाढदिवस अगदी साधारण पद्धतीने साजरा करण्यात आला विशेष म्हणजे या दिवशी त्यांनी बांबूचे १०० प्लांट लाऊन एक आगळा वेगळा मेसेज सर्वांना दिला आहे वाढदिवसानिमित्त विनाकारण खर्च करण्यापेक्षा तो खर्च वाचवून आपण जर निसर्गावर पर्यावरण वाचवण्यावर तो खर्च केला तर नक्कीच याचा फायदा सर्वांना होणार आहे असे ते बोलताना म्हणाले आज दिवसेंदिवस झाडांची संख्या कमी होत चालली आहे त्यामुळे कार्बन चे हवेतील प्रमाण वाढले आहे आणि ऑक्सिजन कमी होत चालला आहे आणि यामुळे जगाला ग्लोबल वॉर्मिंग ला सामोर्य जावे लागत आहे आज हवेतील प्रदूषण एवढे वाढले आहे की आज बऱ्याच ठिकाणचे तापमान हे ५० डिग्री क्रॉस केलेले आहे आणि यावर जर आपल्याला कंट्रोल आणायचे असेल तर यावर फक्त येकच पर्याय आहे तो म्हणजे जास्तीत जास्त झाडे लागली गेली पाहिजे आणि त्याचे संगोपन ही झाले पाहिजे आज बांबू चे झाडे लावली तर बांबू हे जास्त ऑक्सिजन सोडते आणि जास्तीत जास्त कार्बन खेचून घेते मानवाला जगण्यासाठी एका वर्षामध्ये २८० केजी ऑक्सीजन लागतो आणि बांबूचे एक रोप ३२० केजी ऑक्सिजन आपल्याला देते असे बोलताना त्यांनी सांगितले आणि येणाऱ्या काळात जर जगाला ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येपासून जर आपल्याला वाचवायचे असेल तर जास्तीत जास्त बांबू लागवडीकडेशेतकऱ्यांनी वळणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले या वाढदिवसा प्रसंगी अग्रिहिता ग्रुप चे सीएमओ प्रशांत नागणे फाउंडर लीडर डीएसपी सर आणि लोखंडे सर यांनी उपस्थिती दर्शवली

Previous articleराज्यात पहिली आलेली “रूंजी” हिचा शहरात प्रथमच सत्कार
Next articleगतिमान प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक– जिल्हाधिकारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.