Home पुणे मारुंजी येथे इंदाई पाणपोईचे उत्साहात उद्घाटन संपन्न

मारुंजी येथे इंदाई पाणपोईचे उत्साहात उद्घाटन संपन्न

185

आशाताई बच्छाव

1001392957.jpg

पुणे, सुर्यकांत भोर प्रतिनिधी –भोर वस्ती वर या पा पाणपोईचे उद्घाटन युवा नेते श्री संतोष बाजीराव जगताप व सागर चंद्रकांत भाऊ जगताप यांच्या शुभहस्ते ठीक सहा वाजता करण्यात आले. मारुंजी गाव पाण्यापासून खूप वंचित होते भोर वस्तीवर पाण्याचा स्रोत पूर्वी कोठेच नव्हता 1976 मध्ये तीन किलोमीटर श्री रानवडे जेके फॉर्म मधून माता-भगिनी तीन किलोमीटर पर्यंत पायपीट करत ह असे व गावांमध्ये एक गावकीची विहीर होती ते उन्हाळ्यात खूप कमी प्रमाणात पाणी असे व माता भगिनी पहाटे चार वाजता त्या विहिरीत पोहऱ्याने पाणी काढत असे मध्ये काही दिवस ग्रामपंचायतीने शाळेसमोर बोरवेल घेतले त्या बोरला थोडेफार प्रमाणात पाणी लागले परंतु परिस्थिती जैसे थे बोरच्या पाण्यावर पुरुष मंडळी पहाटे चार वाजल्यापासून रांगा लावत असे व सायकल ला 50 लिटरचे काळे कॅन लावून पाणी भरत असे संतोष भाऊ जगताप यांनी त्या बॉक्सवरील संदेश वाचून त्यावर चर्चा केली आपल्या आजोबांनी पाहिले नदीमध्ये वडिलांनी पाहिले विहिरीमध्ये आपण पाहतोय नळामध्ये मुले पाहत आहे बाटलीमध्ये नातवंडे कशामध्ये पाहतील मध्ये कॅप्सूल मध्ये जल है तो कल है पाण्याची बचत काळाची गरज सेव वॉटर असे संतोष भाऊंनी विचार मांडले आपल्या भोर वस्तीला शुद्ध पाणी मिळण्यासाठी व आपल्या सर्वसामान्यांचे तहान भागवण्यासाठी इंदाई अक्वा हा प्रकल्पअत्यंत उपयुक्त ठरेल असे मत संतोष भाऊंनी मांडले इंदाई ग्रुप परिवाराचे सुरू केलेल्या या उपक्रमाला संपूर्ण मारुंजी परिसरातील नागरिकांनी भरभरून दाद देत कौतुक केले आहे.