Home बुलढाणा EXCLUSIVE! चिखलीत खळबळजनक घटना : विहिरीत सापडला महिलेचा मृतदेह – दोन दिवसांपासून...

EXCLUSIVE! चिखलीत खळबळजनक घटना : विहिरीत सापडला महिलेचा मृतदेह – दोन दिवसांपासून होती बेपत्ता ! –

91

आशाताई बच्छाव

1001392843.jpg

EXCLUSIVE! चिखलीत खळबळजनक घटना : विहिरीत सापडला महिलेचा मृतदेह – दोन दिवसांपासून होती बेपत्ता ! –
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ पन्हाळकर
बुलडाणा :- चिखली शहरातील स. द. म्हस्के रोडवरील विहिरीत 65 वर्षीय वृद्धेचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही महिला मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होती. मृत महिलेची
ओळख दुर्गाबाई जुलालसिंग राजपूत (वय ६५, रा. रामानंद नगर, चिखली) अशी झाली आहे.
दुर्गाबाई राजपूत यांचा ४ एप्रिलपासून शोध सुरू होता. त्यांच्या नातेवाइकांनी चिखली पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, दोन दिवसांच्या शोधानंतर आज (रविवार) दिनांक ६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास स. द. म्हस्के रोडवरील एका विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. ही माहिती समजताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू केला. मृतदेह विहिरीत सापडल्याची बातमी वार्यासारखी पसरताच नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली. दुर्गाबाई यांनी आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, दुर्गाबाई यांच्या मृत्यूमागे आत्महत्या, घातपात की अन्य कोणतीही शक्यता आहे का, याचा छडा लावण्याचे काम सुरू आहे.

Previous articleबुलढाण्यात महावीर जयंती निमित्त मांस विक्री बंद ! – मांस विक्री केली -तर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा !
Next articleभाजपच्या वतीने स्थापना दिवस व श्रीराम नवमी उत्साहात साजरी.._
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.