Home जालना श्री क्षेत्र वालसा वडाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात

श्री क्षेत्र वालसा वडाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात

138

आशाताई बच्छाव

1001390259.jpg

श्री क्षेत्र वालसा वडाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात
जाफराबाद जालना प्रतिनिधी –
मुरलीधर डहाके
दिनांक 07/04/2025
भोकरदन तालुक्यातील श्री क्षेत्र वालसा वडाळा येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू होत आहे. तसेच श्री क्षेत्र वालसा वडाळा हे दक्षिणमुखी हनुमान या नावाने प्रसिद्ध आहे वालसा वडाळा हे गाव क वर्ग तिर्थक्षेत्रात सामाविष्ट आहे.संगीत रामकथा वर्षे ६१ वे आहे, दिनांक ४/०४/२०२५ रोजी पासुन अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली आहे, दैनंदिन कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ४:३० ते ६:३० काकडा आरती, ०७ ते ०८ विष्णु सहस्रनाम,०८ ते १० ज्ञानेश्वरी पारायण,१० ते ०२ संगीत रामकथा सायंकाळी ०५ ते ६:३० हरिपाठ रात्री ०९ ते ११ हरी किर्तन दिनांक ०४/०४/२०२५ रोजी हरी भक्त पारायण कुमारी धनश्री ताई ठाकरे यांचे किर्तन पार पडले . दिनांक ०५/०४/२०२५ रोजी हरी भक्त पारायण संजय महाराज देशमुख यांचे किर्तन पार पडले. दिनांक ०६/०४/२०२५ रोजी हरी भक्त पारायण कैलास महाराज बनकर यांचे किर्तन दिनांक ०७/०४/२०२५ रोजी हरी भक्त पारायण साध्वी सोनाली दिदी कर्पे यांचे किर्तन, दिनांक ०८/०४/२०२५ रोजी हरी भक्त पारायण सोपान दादा कनेरकर यांचे किर्तन, दिनांक ०९/०४/२०२५ रोजी हरी भक्त पारायण जान्हवी ताई सोनवणे यांचे किर्तन दिनांक १०/०४/२०२५ रोजी हरी भक्त पारायण रविंद्र महाराज महाले यांचे किर्तन, दिनांक ११/०४/२०२५ रोजी दुपारी ११ वाजता हरी भक्त पारायण कुमारी मोनीका ताई खाडे यांचे काल्याते किर्तन होईल, सायंकाळी ०५ ते ०७ महाप्रसाद ला सुरुवात होईल, रात्री १२वाजता श्री ची पालखी मिरवणूक काढण्यात येईल, तसेच दिनांक १२/०४/२०२५ रोजी सकाळी ५:५९ ला श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येईल व त्यानंतर सकाळी ७:३० वाजता श्री च्या मुर्ती ला अलंकार परिधान समारोह होईल, तसेच रात्री १२ वाजता श्री हनुमंतरायाची स्वारी निघेल, दिनांक १३/०४/२०२५ रोजी सकाळी ८ वाजता झाड झुडी चे सोंग निघेल व यात्रेचा समारोप होईल.

Previous articleभाजपा स्थापना दिवस व श्रीराम नवमी उत्साहात साजरी!
Next articleश्री क्षेत्र वालसा वडाळा येथे श्री प्रभु श्रीरामचंद्र जन्म महोत्सव साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.