Home बुलढाणा EXCLUSIVE- ‘उन्नती’ नावाची अधोगती – आर्थिक फसवणुकीचा भडका मलकापूरमध्ये – १० कोटींचा...

EXCLUSIVE- ‘उन्नती’ नावाची अधोगती – आर्थिक फसवणुकीचा भडका मलकापूरमध्ये – १० कोटींचा घोटाळा ! – पतसंस्थेचा काळा कारभार उघड – ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये वाऱ्यावर ! – १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल –

97

आशाताई बच्छाव

1001390227.jpg

EXCLUSIVE- ‘उन्नती’ नावाची अधोगती – आर्थिक फसवणुकीचा भडका मलकापूरमध्ये – १० कोटींचा घोटाळा ! – पतसंस्थेचा काळा कारभार उघड – ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये वाऱ्यावर ! – १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल –
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :-मलकापूर जिल्ह्यातील आर्थिक व्यवस्थेवर डाग फासणारी धक्कादायक घटना मलकापूरमध्ये उघडकीस आली आहे. उन्नती महिला नागरी सहकारी पतसंस्था तब्बल १० कोटी १३ लाख ४७ हजारांचा अपहार केल्याचा गंभीर ठपका ठेवण्यात आला असून, या प्रकरणातील प्रमुख आरोपी व्यवस्थापक राजेश चव्हाण याला अखेर अटक करण्यात आली आहे.
राजेश चव्हाण तब्बल ८ महिन्यांपासून फरारहोता. बुलढाणा आर्थिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गुप्त
माहितीवरून १ एप्रिल रोजी बारादारी येथून त्याला अटक केली. दुसऱ्याच दिवशी २ एप्रिलला न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी ७दिवस पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने कोठडी नाकारत न्यायालयीन कोठडी सुनावली, आणि त्याची रवानगी बुलढाणा कारागृहात करण्यात आली. या आर्थिक फसवणूक प्रकरणात संस्थेच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा, १० संचालक, व्यवस्थापक आणि कर्मचारी अशा एकूण १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष लेखापरीक्षक सौ.ए.एम. व्यवहारे यांनी केलेल्या अहवालावरून ४ ऑगस्ट २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये ७ आरोपींनी अटकपूर्व जामीन घेतले असला, तरी ५ आरोपी अद्यापही फरार आहेत.

या घोटाळ्यामुळे संस्थेवरील ठेवीदारांचा विश्वास डळमळीत झाला असून, पतसंस्थांच्या पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आता उर्वरित फरार आरोपींना कधी अटक होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.