Home बुलढाणा EXCLUSIVE – ‘बात लग्नवाढदिवसाची!’ पंतप्रधान नरेंद्र मोदी बुलढाण्यात येणार? – केंद्रीय -मंत्री...

EXCLUSIVE – ‘बात लग्नवाढदिवसाची!’ पंतप्रधान नरेंद्र मोदी बुलढाण्यात येणार? – केंद्रीय -मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले..

98

आशाताई बच्छाव

1001382662.jpg

EXCLUSIVE – ‘बात लग्नवाढदिवसाची!’ पंतप्रधान नरेंद्र मोदी बुलढाण्यात येणार? – केंद्रीय -मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलडाणा केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव व राजेश्रीताई जाधव यांच्या
लग्नाचा १ एप्रिलला ४८वा वाढदिवस होता.. त्यानिमित्त त्यांचा परिवार दिल्लीला एकत्र आला होता. बुधवार २ एप्रिल रोजी ११ वाजता या परिवाराने पंतप्रधान कार्यालयात जावून नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. तब्बल १५ मिनीट चाललेल्या या भेटीत मोदी यांनी साधला तो कौटुंबीक संवाद. याप्रसंगी प्रतापराव जाधव यांनी विठ्ठल-रुख्मीणीची मुर्ती पंतप्रधानांना भेट दिली. तर मेहकरच्या शारंगधर बालाजींची प्रतिमा सौ. नम्रता सोहम वायाळ यांनी पंतप्रधानांना भेट देवून, भगवान बालाजीची ही सर्वात उंच मुर्ती ५पून, ननपान बागागापा हातपात उप नुता असल्याचे सांगून लोणार, सिंदखेडराजा व लोणार ऐतिहासीक स्थळांची माहिती मोदीजींना दिली. यावेळी ना. जाधव यांनी पंतप्रधानांना बुलढाणा जिल्हा भेटीचे विशेष निमंत्रण दिले.
पंतप्रधान कार्यालयात नरेंद्र मोदी यांची ना. प्रतापराव जाधव, सौ. राजेश्रीताई जाधव, ऋषी जाधव, सौ. मयुरी जाधव, सोहम वायाळ, सौ. नम्रता वायाळ, श्लोक, ओवी व रणवीर यांनी भेट घेतली. ‘जय महाराष्ट्र’ करुन मोदी यांनी या परिवाराशी आधी मराठीतूनच संवाद साधत ‘कसा झाला गुढीपाडवा?’ हा प्रश्न विचारुन कौटुंबीक संवाद साधला. यावेळी संपुर्ण परिवारासोबत छायाचित्र तर मोदीजींनी घेतलेच, परंतु वेगवेगळेही फोटोज त्यांनी प्रत्येकाला काढू देऊन आनंद द्विगुणीत केला.
विशेष म्हणजे संसदेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडल्या जाण्याची घाई असतांनाही संपुर्ण परिवार भेटीला आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपुलकीने साधलेला संवाद जाधव तथा वायाळ कुटुंबाला अर्थात भावून जाणारा ठरला.