Home बुलढाणा धक्कादायक ! पत्नीच्या छळाला कंटाळून तलाठ्याची आत्महत्या; व्हाट्सअप वर स्टेटस लिहिले, “माझ्या...

धक्कादायक ! पत्नीच्या छळाला कंटाळून तलाठ्याची आत्महत्या; व्हाट्सअप वर स्टेटस लिहिले, “माझ्या मृत्यूनंतर माझा चेहरा बायकोला दाखवू नका….”

141

आशाताई बच्छाव

1001382593.jpg

धक्कादायक ! पत्नीच्या छळाला कंटाळून तलाठ्याची आत्महत्या; व्हाट्सअप वर स्टेटस लिहिले, “माझ्या मृत्यूनंतर माझा चेहरा बायकोला दाखवू नका….”
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा:-संग्रामपूर तालुक्यातील पत्नीच्या नेहमीच्या छळाला कंटाळून संग्रामपूर येथून जवळच असलेल्या तेल्हारा येथील तलाठी शिलानंद तेलगोटे (३९) यांनी आत्महत्या करीत असल्याचे स्टेटस ठेवून घेतला जगाचा निरोप घेतला. सोबतच पत्नीला मेल्यानंतर माझा चेहरा दाखवू नका असेही त्यात म्हटले आहे. यावरून किती टोकाचा छळ झाला असेल याची कल्पना येते. सदर तलाठ्याची पत्नी मुलांसमोर त्यास अश्लील शिवीगाळ करून नेहमी पान-उतारा करत होती. त्यामुळेच आत्महत्या करीत असल्याचे स्टेटसवर तेलगोटे यांनी लिहिले आहे.तेलगोटे यांचा साला प्रवीण गायगोले याला जमीन खरेदी करण्यासाठी तेलगोटे याने व्याजाने पैसे काढून दिले होते.
त्याचा हप्ता व व्याज तेलगोटेच्या पगारातून कटत आहे. प्रवीण मात्र
पगारातून कटत आहे. प्रवीण मात्र पैसे परत करत नसल्याने तलाठी तेलगोटे अस्वस्थ होते. शिवाय गेल्या चार-पाच दिवसापासून मृत तेलगोटे यांनी जेवण सुद्धा केले नव्हते. बायकोकडून होणारा सततचा छळ असह्य झाल्याने तलाठी तेलगोटे यांनी आत्महत्या केली..
पोलिसांनी याप्रकरणी तलाठी तेलगोटे यांची पत्नी प्रतिभा तेलगोटे आणि साल्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..

Previous articleकौळाणेचे भुमिपुत्र सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक प्रकाश रामचंद्र सावकार यांचे दुःखद निधन
Next articleप्रचंड वादळ आणि पावसाने पिंपळगाव राजा येथे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.