आशाताई बच्छाव
प्रियदर्शी सम्राट अशोक मौर्य जयंतीनिमित्त महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन महारॅली(जनसभा)
६ एप्रिलला बेझनबाग मैदान येथे
संजीव भांबोरे
नागपूर- प्रियदर्शी सम्राट अशोक मौर्य जयंतीनिमित्त महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन महरॅली (जनसभेचे) आयोजन ६ एप्रिल 2025 ला बेजनबाग मैदान येथे (उत्तर नागपूर) चैत्रसूत्र अष्टमीनिमित्त विशाल महासभेचे आयोजन सायंकाळी ४ ते १० रात्री वाजेपर्यंत करण्यात आलेले आहे .या रॅलीच्या अध्यक्षस्थानी डॉ.विलास खरात राष्ट्रीय संयोजक महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संघर्ष समिती नवी दिल्ली तथा राष्ट्रीय अध्यक्ष सनातन धम्म राहतील .कार्यक्रमाचे उद्घाटन भीमराव आंबेडकर राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया हे करतील. मार्गदर्शक म्हणून पूज्य भदंत रामगिरी चंद्रपूर उपस्थित राहतील. विशेष अतिथी म्हणून खासदार चंद्रशेखर आजाद राष्ट्रीय अध्यक्ष आजाद समाज पार्टी ,सतीश दास आमदार बिहार विधानसभा हे उपस्थित राहतील. तर प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र पाल गौतम आंबेडकरवादी नेता दिल्ली, एडवोकेट महमूद प्राचा सुप्रीम कोर्ट वकील दिल्ली, प्रमुख उपस्थिती म्हणून रघु आंबेडकर मथुरा ,राकेश धारगावे दीक्षाभूमी बचाव संघर्ष समिती नागपूर ,स्मिता कांबळे इंडिया अगेनस्ट ईव्हीएम राष्ट्रीय समन्वयक नागपूर, कीर्ती डोंगरे सामाजिक कार्यकर्त्या नागपूर ,भंते विनयाचार्य उत्तर प्रदेश, अँड डॉ. रमेश राठोड ओबीसी धम्मदीक्षा समारोह समिती नागपूर ,प्रोफेसर डॉ. वंदना ओमेगा ख्रिश्चन महासंघ महिला प्रकोष्ट राष्ट्रीय अध्यक्षा नागपुर ,अतुल खोब्रागडे युवा ग्रॅज्युएट फोरम नागपूर ,नेत्रपाल बृजवासी बहुजन चिंतक तथा राष्ट्रीय गीतकार मथुरा, भाई मनदीप सिंह नागपूर ,अशोक सरस्वती संयोजक बुद्ध विहार समन्वयक समिती नागपूर ,प्रफुल शेंडे भीम आर्मी संविधान रक्षक दल महाराष्ट्र ,तथा संपूर्ण भिक्षू संघ यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील .कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन महाबोधी महाविहार तथा सम्राट अशोक ,भगवान बुद्ध, तथा बुद्ध, फुले ,शाहू ,आंबेडकरी संघटक यांनी केलेले आहे.






