Home बुलढाणा शेगांव शहरातील माऊली नगरात २४ वर्षीय युवतीने गळफास लावून संपवले जीवन….

शेगांव शहरातील माऊली नगरात २४ वर्षीय युवतीने गळफास लावून संपवले जीवन….

81

आशाताई बच्छाव

1001381222.jpg

शेगांव शहरातील माऊली नगरात २४ वर्षीय युवतीने गळफास लावून संपवले जीवन….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- शेगांव शेगाव शहरातील माऊली नगरातील एका २४ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री ९ वाजता सुमारास उघडकीस आली आहे. सविस्तर वृत्त असे की शहरातील माऊली नगरात एका २४ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्री ९ वाजता उघडकीस आली.
याबाबत प्रमोद पांडुरंग मावळे यांनी शेगाव शहर पोलिसात तक्रार दिली की, माझी मुलगी क्षितिजा प्रमोद मावळे ही आमच्या मूळ गाव पातुर्डा येथून शेगाव येथील घरी जाऊन अभ्यास करते असे सांगून पातुर्थ्यावरून शेगाव येथे आली. त्यानंतर रात्री ९ वाजता सुमारास शेगाव येथील घरी आली.
मी आपल्या मुलीस हाक मारली असता तिने घराचा दरवाजा न उघडल्याने खिडकीचे काच फोडून घरात प्रवेश केला. तेव्हा मुलगी बेडरूममध्ये सीलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आली. अशा फिर्याद वरून शहर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. याचा पुढील तपास शेगाव पोलीस स्टेशनचे पोहेकॉ संजय करूटले करत आहेत.