Home बुलढाणा शेगाव खामगाव महामार्गावर र्भीषण अपघात, 5 जण ठार, एसटी व लक्झरी बसच्यामध्ये...

शेगाव खामगाव महामार्गावर र्भीषण अपघात, 5 जण ठार, एसटी व लक्झरी बसच्यामध्ये बोलेरा कारचा चेंदामेंदा 24 जखमी

135

आशाताई बच्छाव

1001381217.jpg

शेगाव खामगाव महामार्गावर र्भीषण अपघात, 5 जण ठार, एसटी व लक्झरी बसच्यामध्ये बोलेरा कारचा चेंदामेंदा 24 जखमी
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-शेगाव आज सकाळी साडेपाचच्या सुमारास शेगाव खामगाव महामार्गावर भरधाव बोलेरो कार एसटी बसवर धडकली. त्यानंतर पाठीमागून येणारी खाजगी प्रवासी बस ही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली.
या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी
घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. तर जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. मात्र हा भीषण अपघात नेमका कसा आणि कुणाच्या चुकीमुळे झाला, हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एसटी अन् लक्झरी बसच्यामध्ये बोलेरा कारचा चेंदामेंदा झाला आहे.
अपघातातील भरधाव बोलेरो शेगावकडून कोल्हापूरकडे जात होती. याच वेळी एक एसटी महामंडळाची बस जी पुण्याकडून परतवाडाकडे जात होती. अशातच एक खासगी प्रवासी वाहतूक बस या दोन अपघातग्रस्त वाहनांना धडकली. हा अपघात इतका भीषण होता की यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहे, त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यातील तीनही वाहनांचा चुराडा झाला आहे. सध्या घटनास्थळी पोलीस मोठ्या प्रमाणात हजार असून पुढील कारवाई केली जात आहे.

Previous article१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिम नांदेड तहसीलचे नाविन्यपूर्ण उपक्रम
Next articleशेगांव शहरातील माऊली नगरात २४ वर्षीय युवतीने गळफास लावून संपवले जीवन….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.