आशाताई बच्छाव
कोल्हापूर येथील ग्रामसंसद कार्यालयामध्ये जिवंत सातबारा मोहीम
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक 03/04/2025
सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील कोल्हापूर गावातली ग्रामसंसद कार्यालय येथे शासनाने ठरवलेल्या जिवंत सातबारा ही मोहीम राबिण्यात आली आहे.
ही मोहीम महसूल विभागा मार्फत राबविली जाते. यामध्छे 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत दिनांक 01 मार्च 2025 पासुन प्रत्येक जिल्ह्यात सर्व गावांमध्ये *जिवंत सातबारा मोहीम* राबविण्यात येत असून या मोहीमे अंतर्गत सातबारावरील गावातील सर्व मयत खातेदाराच्या वारसाच्या नोंदींची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. मयत खातेदार यांच्या वारसांना शेत जमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसाची नोंद विहित कालावधी त अधिकार अभिलेखांमध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे.
यावेळी या मोहिमे अंतर्गत कोल्हापूर ग्रॅम संसद कार्यालय येथे तलाठी इंगळे साहेब, सरपंच गजानन पाटील जाधव, शेतकरी प्रलाद पाटील जाधव, आमोल जाधव ,गुलाबराव जाधव, अर्जुन हिवाळे ,विठ्ठल जाधव व गावातील मडंळी उपस्थीत होते.






