Home उतर महाराष्ट्र धावडे : अंगणवाड्यांना पंख्यांचे वाटप; श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम

धावडे : अंगणवाड्यांना पंख्यांचे वाटप; श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम

144

आशाताई बच्छाव

1001380420.jpg

धावडे : अंगणवाड्यांना पंख्यांचे वाटप; श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम

धावडे (ता. शिंदखेडा) रमेश रामराजे प्रतिनिधी: उन्हाळ्याच्या दिवसात लहानग्यांना दिलासा मिळावा या उद्देशाने दोंडाईचा येथील सुप्रसिद्ध श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. दिलीप पाटील यांच्या वतीने धावडे येथील अंगणवाडी क्रमांक १, २ आणि ३ येथे पंख्यांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी गावाचे नवनिर्वाचित सरपंच जगदीश पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. . कार्यक्रमाची प्रस्तावना ईशी सर यांनी केली. यावेळी डॉ. दिलीप पाटील यांनी समाजासाठी काहीतरी करण्याची गरज अधोरेखित करत “आपण समाजाचे देणे लागतो आणि आपले कर्तव्य आपल्या परीने पार पाडले पाहिजे” असे विचार व्यक्त केले.

कार्यक्रमात डॉ. प्रमोद गिरासे, रमेश रामराजे, आनंदा पाटील, विजयसिंग गिरासे, नाना पिंपळे, सतपाल गिरासे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामस्थांनी या स्तुत्य उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. अंगणवाडीतील शिक्षक आणि पालकांनीही ही मदत लहान मुलांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. समाजातील प्रत्येकाने आपल्या परीने योगदान दिल्यास गावाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Previous articleआदर्श विद्या मंदिर सोनई येथे सेवापुर्ती कार्यक्रम संपन्न
Next articleकोल्हापूर येथील ग्रामसंसद कार्यालयामध्ये जिवंत सातबारा मोहीम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.