Home जालना कोल्हापूर येथील ग्रामसंसद कार्यालयामध्ये जिवंत सातबारा मोहीम

कोल्हापूर येथील ग्रामसंसद कार्यालयामध्ये जिवंत सातबारा मोहीम

399

आशाताई बच्छाव

1001380458.jpg

कोल्हापूर येथील ग्रामसंसद कार्यालयामध्ये जिवंत सातबारा मोहीम

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक 03/04/2025

सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील कोल्हापूर गावातली ग्रामसंसद कार्यालय येथे शासनाने ठरवलेल्या जिवंत सातबारा ही मोहीम राबिण्यात आली आहे.

ही मोहीम महसूल विभागा मार्फत राबविली जाते. यामध्छे 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत दिनांक 01 मार्च 2025 पासुन प्रत्येक जिल्ह्यात सर्व गावांमध्ये *जिवंत सातबारा मोहीम* राबविण्यात येत असून या मोहीमे अंतर्गत सातबारावरील गावातील सर्व मयत खातेदाराच्या वारसाच्या नोंदींची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. मयत खातेदार यांच्या वारसांना शेत जमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसाची नोंद विहित कालावधी त अधिकार अभिलेखांमध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे.

यावेळी या मोहिमे अंतर्गत कोल्हापूर ग्रॅम संसद कार्यालय येथे तलाठी इंगळे साहेब, सरपंच गजानन पाटील जाधव, शेतकरी प्रलाद पाटील जाधव, आमोल जाधव ,गुलाबराव जाधव, अर्जुन हिवाळे ,विठ्ठल जाधव व गावातील मडंळी उपस्थीत होते.

Previous articleधावडे : अंगणवाड्यांना पंख्यांचे वाटप; श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम
Next articleसाडेचार हजार चित्रांतून साकारली दोन किमी लांबीची कॉमिक स्ट्रीप.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.