Home जालना सागर सहकारी साखर कारखान्यातल्या गन मेटल चोर पोलिसांच्या ताब्यात (स्थानिक गुन्हे शाखेची...

सागर सहकारी साखर कारखान्यातल्या गन मेटल चोर पोलिसांच्या ताब्यात (स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई)

120

आशाताई बच्छाव

1001380393.jpg

सागर सहकारी साखर कारखान्यातल्या गन मेटल चोर पोलिसांच्या ताब्यात (स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई)
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक ०३/०४/२०२५
याविषयी सविस्तर माहिती अशी की जालना जिल्ह्यातील सागर सहकारी साखर कारखाना तीर्थपुरी जिल्हा जालना येथे दिनांक २२/०३/२०२५ रोजी कारखान्याच्या स्टोअरमधून गण मेटल सॉलिड बार हॅलो बार रॅकटॅगुलर बार असे १,३५,४२० रुपये किमतीचे दहा नग चोरी झाले बाबत फिर्यादी विजय बाबासाहेब कळकटे याचे तक्रारीवरून पोलीस ठाणे तीर्थपुरी येथे गु.र.न.४२/२०२५,कलम ३०३(२)भा.न्या.स. अन्वये गुन्हा दाखल होता.
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अमलदार हे सदर गुन्हेगाराची माहिती घेत असताना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हेगार कैसर निसार शेख वय ४७ वर्ष राहणार वार्ड क्रमांक एक मिल्लत नगर श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर ह्याने साथीदारासह गुन्हा केल्याची माहिती मिळाल्याने त्यास श्रीरामपूर येथून ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातून गुन्ह्यातील चोरी गेलेला माल एकूण १,११,५८५ रुपये किमतीचा गन मेटल धातूचे विविध बार जप्त करण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, लक्ष्मीकांत आडेप ,इर्शाद पटेल, देविदास भोजने, सतीश श्रीवास, सागर बाविस्कर, अक्रूर धांडगे, कैलास चेके यांनी केली आहे.

Previous articleभोकरदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचा आज वाढदिवस वाढदिवसानिमित्तनिमित्त सत्कार करताना गजेंद्र लोखंडे व सुनील उंबरकर
Next articleआदर्श विद्या मंदिर सोनई येथे सेवापुर्ती कार्यक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.