Home जालना जालना येथे ‘द पॅशन ऑफ द क्राईस्ट’ नाटकाचे भव्य आयोजन

जालना येथे ‘द पॅशन ऑफ द क्राईस्ट’ नाटकाचे भव्य आयोजन

128

आशाताई बच्छाव

1001366060.jpg

जालना येथे ‘द पॅशन ऑफ द क्राईस्ट’ नाटकाचे भव्य आयोजन
जालना,(प्रतिनिधी दिलीप बोंडे)- प्रभू येशू ख्रिस्तांनी मानवजातीसाठी  जे बलीदान दिले त्यावर आधारित भव्य दिव्य आणि हृदयस्पर्शी  द पॅशन ऑफ द क्राईस्ट नाटकाचे आयोजन फेथ फाऊंडेशन, पुणे यांच्या सादरीकरणातून तब्बल 65 कलाकारांच्या अभिनयातून जालना शहरात  साकारले जाणार आहे.
हे नाटक दिनांक: 29 मार्च 2025 (शनिवार) रोजी संध्याकाळी 6 वाजता  डॉ. फ्रेझर बॉईज हायस्कूल ग्राउंड, जालना येथे सादर करण्यात येणार आहे  ख्रिस्ती बांधवांचे पवित्र 40 दिवसांचे उपवास सध्या सुरू असून, या नाटकाद्वारे प्रभू येशूनी मानवजातीसाठी दिलेल्या बलिदानाची जाणीव होईल व आध्यात्मिक उन्नती साधता येईल.  या नाटकाद्वारे प्रभू येशू ख्रिस्तांच्या त्यागाची आणि प्रेमाची कथा प्रेक्षकांसमोर मांडली जाणार आहे. हा कार्यक्रम पाहून प्रत्येकाला आशिर्वाद मिळावा, असा आयोजकांचा उद्देश आहे.    या विशेष कार्यक्रमाचे आयोजन सर्व चर्च, जालना पास्टर्स फेलोशिप आणि ख्रिस्ती समाजाच्या सहयोगाने करण्यात आले आहे. जालनावासीयांनी या पवित्र आणि प्रेरणादायी नाटकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Previous articleगोदा समृध्दी कृषी महोत्सवाचे आयोजन
Next articleबोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या मागणीच्या समर्थनार्थ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.