Home नागपूर बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या मागणीच्या समर्थनार्थ

बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या मागणीच्या समर्थनार्थ

211

आशाताई बच्छाव

1001366113.jpg

बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या मागणीच्या समर्थनार्थ

नागपूर वरून महामाया बहुउद्देशीय महिला सामाजिक न्याय संघटनेचे पदाधिकारी बोधगया येथे रवाना

नागपूर- संजीव भांबोरे–महामाया बहुउद्देशीय महिला सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र चे सर्व पदाधिकारी नागपूर वरून 29 मार्च 2025 ला सकाळी 6 वाजता बोधगया येथे जाण्याकरिता रवाना झालेले आहेत.बोधगया येथे 12 फरवरी 2025 पासून सुरू असलेल्या महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा या आंदोलनाला समर्थन देण्याकरिता साकोली येथील महामाया बहुउद्देशीय महिला सामाजिक न्याय संघटनेचे पदाधिकारी निघालेले आहेत.
बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा, 1949 चा कायदा रद्द करा या मागणीला धरून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात महामाया सामाजिक न्याय संघटनेचे संस्थापक डी .जी .रंगारी, महाराष्ट्राचे अध्यक्ष शितल नागदेवे, उपाध्यक्ष मीनाक्षी वाहने हे नेतृत्व करत असून या प्रसंगी
विदर्भ अध्यक्ष निशा मेश्राम ,कौतुका देशभ्रतार, मालता चौरे , वैशाली देशभ्रतार, तारा डोंगरे ,पंकज वाहने, , प्रतिमा राऊत, कमला रंगारी व इतर सामाजिक न्याय संघटनेचे सर्व पदाधिकारी रवाना झालेले आहेत. यात एकूण 10 महिला व 2 पुरुषांचा सहभाग आहे.

Previous articleजालना येथे ‘द पॅशन ऑफ द क्राईस्ट’ नाटकाचे भव्य आयोजन
Next articleजगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज र-व: स्वरुप संप्रदाय तर्फे मोहाडीत गुढीपाडवा शोभायात्रा मोठ्या उत्साहात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.