Home बुलढाणा BIG NEWS (क्राईम स्टोरी) म्हणे..’25 लाख रुपयांत देतो एक किलो सोने !’...

BIG NEWS (क्राईम स्टोरी) म्हणे..’25 लाख रुपयांत देतो एक किलो सोने !’ – ग्राम थड येथे 6 आरोपींनी तिघांना गंडवले ! – आरोपी -नकली पोलीस सुद्धा बनले !

218

आशाताई बच्छाव

1001365473.jpg

BIG NEWS (क्राईम स्टोरी) म्हणे..’25 लाख रुपयांत देतो एक किलो सोने !’ – ग्राम थड येथे 6 आरोपींनी तिघांना गंडवले ! – आरोपी -नकली पोलीस सुद्धा बनले !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- बुलडाणा बाजारभावाच्या निम्म्या दरात सोने भेटते म्हणून तिघांची लालसा वाढली. 25 लाखात एक किलो सोने मिळते म्हणून तिघांनी पैसे गोळा केले आणि प्रमुख 2 आरोपींनी 4 नकली पोलिसांच्या वेशातील आरोपीसह तिघांची ग्राम थड येथील गजानन महाराज मंदिर, मोताळा येथे मोठी फसवणूक केली.
सदर घटनेची तक्रार धामणगाव बढे पोलीस ठाण्यात तक्रारदार आनंदा नारायण जंजाळ रा. भराडी, जामनेर जळगाव यांनी दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अजय प्रभाकर नाईक पाटील रा.जामनेर आनंदनगर, जि. जळगाव व गोविंदा काशीराम रोकडे रा.लावखेड ता. पातुर जि. अकोला आणि इतर 4 आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हकीकत अशी आहे की, आनंदा नारायण जंजाळ भराडी ता. जामनेर, शंकर राजाराम चौधरी रा. भराडी हमु जामनेर, हर्षल धर्मराज चौधरी रा. नाचणखेडा ता. जामनेर जि. जळगाव हे तिघे मित्र आहेत. या तिघांची भेट गावातील शंकर राजाराम चौधरी यांच्या गॅरेजवर नेहमी होत होती. आरोपी प्रभाकर नाईक पाटील दोन वर्षापासून या तिघांचा मित्र बनलेला होता. अजय नाईकने एक दिवशी गॅरेजवर येऊन तिघांना आरोपी गोविंदा रोकडे याला घराच्या बांधकामात भरपूर जुने सोने सापडले आहे आणि त्याने सोने बाजार भावापेक्षा निम्म्या भावात विकायला काढले असून 25 लाखात एक किलो सोने देऊ शकतो अशी बतावणी केली. सतत दोन ते तीन महिने वारंवार नाईकने तिघांना सोने घेण्याचा आग्रह केला. तिघांनाही आरोपी गोविंदा रोकडेचे नवीन बांधकाम केलेले घर दाखविले. त्याच्या बायकोच्या गळ्यातील दाग दागिने दाखविले. बुलेट गाडी दाखवून तिघांना आकर्षित करून त्यांचा विश्वास संपादन केला. दरम्यान तिघांनी रोकडे याच्या कडील सोने पाहून खात्री करून सोने घेण्याचे ठरविले. आरोपी नाईकने या तिघांची रोकडे याच्यासोबत अटाळी येथील एका धाब्यावर भेट घालून दिली.
यावेळी रोकडे च्या गळ्यात हातात सोने दिसल्याने तिघांचा विश्वास आणखी पक्का झाला. दरम्यान नाईकने 22 मार्चला रोकडे सोने घेऊन येत आहे तुम्ही अगदी 25 लाख तयार ठेवा आपल्याला हा सोन्याचा व्यवहार बुलढाण्यात जाऊन करायचा आहे असे सांगितले. त्यामुळे शंकर चौधरीचे 7 लाख, हर्षल चौधरीचे 10 लाख तर आनंदा जंजाळ यांचे 8 लाख असे 25 लाख रुपये घेऊन नाईक यांच्या गाडीने तिघे बुलढाणाकडे
निघाले. आरोपी रोकडे बुलढाण्यातील वाघजाळ फाट्याजवळ आहे असे नाईकने तिघांना सांगितले. धामणगाव बढे येथे रोकडे याने तिघांपैकी फक्त पैशांची पिशवी घेऊन आनंदा जंजाळला आपल्या गाडीत घेतले. धामणगाव बडे रस्त्याने रोकडे याची गाडी निघाली. दरम्यान थड येथील गजानन महाराज मंदिराच्या अलीकडे एका टिनशेड जवळ रात्री 7.45 वाजता पुढे निघालेल्या नाईक याची गाडी 3 ते 4 पोलिसांनी अडविल्याचे दिसले. त्यामुळे त्यांच्या मागे असलेल्या गोविंदा रोकडे याने थोड्या अंतरावर आपली गाडी थांबवून जंजाळ यांना काही लोच्या झाल्याचे सांगून पैसे स्वतः जवळ ठेवून जंजाळ यांना गाडीतून उतरवून दिले. या घटनेनंतर रोकडे ने 25 लाख व सोने पोलिसांनी जप्त केल्याचा बनाव केला. त्यानंतर तुमचे पैसे मी परत देणार म्हणत काही दिवस टाळाटाळ केली. अखेर आरोपी अजय नाईक याने मागील काळात कल्याण येथील एका विधवा महिलेची फसवणूक केल्याची घटना आनंदा जंजाळ व त्यांच्या मित्रांना माहिती पडल्यावर त्यांना आपली देखील फसवणूक झाल्याचे कळून चुकले.

Previous articleइम्पॅक्ट ! ‘युवा मराठा ‘ च्या बातमी नंतर 16 मोबाईलचा शोध !
Next article२तासात पालकमंत्र्यासमोर ६००तक्रारीचा ढीग ८ दिवसात तक्रारीवर झालेल्या कारवाईची मिळणार माहिती.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.