आशाताई बच्छाव
सावंगी तलाव केंद्र राज्यस्तरावर शैक्षणिक व्हिडिओ बनविण्यात जिल्ह्यात अव्वल क्रमांक
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक २५/०३/२०२५
राज्यस्तरावर शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेचे मूल्यांकन पूर्ण झाले असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरी ,केंद्र सावंगी तलाव, तालुका जालना येथील टेक्नोसेवी शिक्षक श्री प्रशांत लक्ष्मण भुरे यांनी तालुका स्तरावर चार गटात प्रथम क्रमांक तर जिल्हास्तरावर तीन गटात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला आहे. श्री प्रशांत भुरे यांना शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत एकूण सात पुरस्कार मिळाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी डॉक्टर भरत वानखेडे साहेब व सावंगी तलाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री भागवत जेटेवाड सर आणि केंद्रातील सर्व शिक्षकांनी श्री प्रशांत लक्ष्मण भुरे यांचे अभिनंदन केले आहे.
यावेळी केंद्रीय मुख्याध्यापक श्री प्रमोद पवार, श्री नारायण मोहोरे, श्री लक्ष्मण राठोड, श्री किसन इरमले, श्री राहुल डासाळकर, श्री केशव तळेकर सर , श्री गंगाधर होनवडजकर , श्री रमेश रुद्रे सर, श्री बुंधे सर, श्री गणेश जाधव सर, श्री हुसेन सर, श्री अशोक जांभरूनकर , श्री गणेश कोरधने, श्री सत्यव्रत लोखंडे, श्री राजू सदावर्ते, श्री गोविंद मादीलवाड, प्रमोद साठेवाड, श्रीमती सीमंत मॅडम, श्रीमती नाडे मॅडम, श्रीमती चव्हाण मॅडम, श्रीमती पाटील मॅडम यांनी सरांना शुभेच्छा दिल्या.






