Home उतर महाराष्ट्र तोफखाना, कोतवाली पोलीस ठाणे हददीत वाढले अवैद्य धंदे : संग्राम जगताप

तोफखाना, कोतवाली पोलीस ठाणे हददीत वाढले अवैद्य धंदे : संग्राम जगताप

101

आशाताई बच्छाव

1001354792.jpg

तोफखाना, कोतवाली पोलीस ठाणे हददीत वाढले अवैद्य धंदे : संग्राम जगताप

अहिल्यानगर, कारभारी गव्हाणे प्रतिनिधी- शहरातील तोफखाना, कोतवाली पोलीस ठाणे हददीत अवैध धंद्यामध्ये वाढ झाली आहे. खून, दरोडा, चोरी अशा घटना वाढत आहेत. पूर्वीच्या काळात पोलिसांकडून रात्रीची गस्त घातली जात होती. त्याची नोंद संबधित पोलीस ठाण्यात तसेच विविध कॉलनी मध्ये होत असे मात्र, आता असे होतांना दिसत नाही. त्यामुळे तोफखाना व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे वाढले आहेत, असा आरोप आमदार जगताप यांनी केला आहे.
कोतवाली व तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत वाढलेल्या गुन्ह्याबाबत आमदार जगताप यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. पूर्वी रात्री ११ नंतर शहर बंद होत असे मात्र, आता नाईटला परवानगी दिली आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. रात्री तीन ते चार वाजेपर्यंत काही नागरिक तारकपूर, पुणे, माळीवाडा बसस्थानक परिसरात फिरताना दिसत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार जगताप यांनी केली

Previous articleसावंगी तलाव केंद्र राज्यस्तरावर शैक्षणिक व्हिडिओ बनविण्यात जिल्ह्यात अव्वल क्रमांक
Next articleउच्च सुरक्षा नंबरप्लेटचे दर माफक व प्रक्रिया सुलभ करावी! ग्राहक पंचायत शाखेची शासनाकडे मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.