Home भंडारा वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील शिवराम/टोला येथील घटना

वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील शिवराम/टोला येथील घटना

170

आशाताई बच्छाव

1001354711.jpg

वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील शिवराम/टोला येथील घटना

संजीव भांबोरे
गोंदिया –जिल्ह्याच्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या शिवराम/टोला गावात आज दि.23 मार्च रोजी रविवार ला सकाळी 8:00 वाजेच्या सुमारास कक्ष क्रमांक 332 जंगल परिसरात मोहफूल वेचायला गेलेल्या महिलेवर दबा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक हल्ला चढविला या हल्यात महिलेचा मृत्यू झाला.अनुसया धानु कोल्हे वय 45 वर्षे असे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.तर या हल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर वाघाने तब्बल तीन तास त्या महिलेच्या मृतदेहा जवळ ठाम बसुन होता.या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आणि वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.तर गावकऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात एकच गर्दी केली होती.महिलेचा मृतदेह वन विभागाने ताब्यात घेतले असून शवविच्छेदन करण्यासाठी केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले आहे.तर वन विभागाने परिसरातील लोकांना जंगलात एकटे जाणे टाळावे असे आव्हान केले आहे.तर वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करुन मृत महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Previous articleशांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या जयंतीचे आयोजन 5 एप्रिल ला
Next articleसौ.दिपालीताई बांडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.