आशाताई बच्छाव
रत्नमाला लॉन्स भोकरदन या ठिकाणी महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा युवा मराठा न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे भोकरदन येथील रत्नमाला लॉंच या ठिकाणी महिलांनी केला महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा या ठिकाणी या कार्यक्रमास माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या पत्नी सौ निर्मलाताई दानवे भोकरदन शहराच्या माजी नगराध्यक्ष मंजुषाताई देशमुख तसेच पोलीस मुख्यालयातील पोलीस महिला अधिकारी त्यानंतर विविध विभागात कार्यरत असणाऱ्या महिला तसेच विविध शाळेवरती शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या महिला शिक्षिका या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या व प्रत्येक शिक्षकेने एक दिवस स्वतःसाठी म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आपली कला या ठिकाणी सादर करून दाखवली या ठिकाणी उंच माझा झोका जागर नारी शक्तीचा पर्व दोन या शीर्षकाने या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सर्व महिलांनी मोठ्या उत्साहाने व आनंदाने हा महिला दिन एकत्र येऊन साजरा करण्यात आला.