Home जालना माहोरा येथे जागतिक महीला दीन व महीला ग्रामसभा कार्यक्रम संपन्न

माहोरा येथे जागतिक महीला दीन व महीला ग्रामसभा कार्यक्रम संपन्न

124

आशाताई बच्छाव

1001306410.jpg

माहोरा येथे जागतिक महीला दीन व महीला ग्रामसभा कार्यक्रम संपन्न
जाफराबाद तालुका प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 09/03/2025

आज दिनांक 08/03/2025 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामसंसद कार्यालय माहोरा येथे महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालविवाह रोखने, पतीच्या निधनानंतर रूढी व अंधश्रद्धा यामुळे महिलांना जाचक असणाऱ्या प्रथा बंद करणे, मुलीचा जन्मदर वाढवा यासाठी प्रयत्न करणे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाय योजना करणे या संदर्भात सरपंच श्री. गजाजन पाटील लहाने, श्री. पंचायत अधिकारी श्री. आर. बी. दांडगे साहेब, पंचायत अधिकारी संजीवनी पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री. गडकरी अण्णा यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच श्री. गजाजन पाटील लहाने, उपसरपंच श्री. बाबासाहेब बोरसे, पंचायत अधिकारी श्री. दांडगे साहेब, पंचायत अधिकारी संजीवनी पाटील, सर्व ग्रा. पं. सदस्य, सामाजिक कार्यकर्ते श्री. गडकरी अण्णा, अंगणवाडी ताई, आशा वर्कर, बचत गट महिला, पत्रकार श्री. संतोष गौरकर, श्री. विलास लहाने, लक्ष्मन वाघ, विकास जाधव, विजय इंगळे व गावातील ईतर महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleजागतिक महिला दिनाच्या रात्रीच विधवा महिलेच्या घरी मोठी घरफोडी
Next articleरत्नमाला लॉन्स भोकरदन या ठिकाणी महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.