Home नाशिक जागतिक महिला दिनाच्या रात्रीच विधवा महिलेच्या घरी मोठी घरफोडी

जागतिक महिला दिनाच्या रात्रीच विधवा महिलेच्या घरी मोठी घरफोडी

127

आशाताई बच्छाव

1001306351.jpg

(भिला आहेर तालुका प्रतिनिधी)
देवळा :- जागतिक महिला दिनाच्या रात्रीच विधवा महिलेच्या घरी मोठी घरफोडी
मेशी येथे मेशीफाटा परिसरात सोनाली रवींद्र सोनवणे (वय-३३) ही विधवा महिला एक मुलगी व एका मुलासोबत शेतात राहतात. रात्रीच्या सुमारास घराला कुलूप लावून महिला व दोन्ही मुलं हे बाहेर झोपले असता चोरट्यांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास सोनवणे यांच्या घराचे कुलूप तोडून घरात घुसत लोखंडी कपाटातून रोख रक्कम सत्तर हजार रुपये लंपास केले आहेत पहाटे पाच वाजता त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरड करत आसपासच्या लोकांना सांगितले त्यानंतर सकाळी देवळा पोलीस ठाण्यात सोनवणे यांनी फिर्याद दाखल करत देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत तपासाला गती देत घटनास्थळी नाशिक येथील श्वानपथक व ठसा तज्ञ पाचारण केले असता श्वानपथकाने जवळच एका ठिकाणी मार्ग दाखवला असता पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.दोन वर्षांपूर्वीच सदरहू महिलेच्या पतीचे बाबावाडी जवळ अपघाती निधन झाले होते त्या दुःखातून सावरत नाही तोच घरफोडी झाल्याने सोनवणे ह्या कमालीच्या धास्तावल्या आहेत.याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात भा. द. वि. कलम 305(अ),331(4) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भास्कर सोनवणे हे करीत आहेत.

Previous articleसाकोलीत ३६ झुंजार महिलांचा झाला गौरव सत्कार “नंदीशा विंग्स फाऊंडेशन” तर्फे महिला दिनी अभिनव उपक्रम
Next articleमाहोरा येथे जागतिक महीला दीन व महीला ग्रामसभा कार्यक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.