आशाताई बच्छाव
रोझे गावी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा! मालेगाव प्रतिनिधी:- आज आठ मार्च जागतिक महिला दिन रोझे गावी सहायक पोलिस निरीक्षक अभिमन्यू गायकवाड यांच्या संकल्पनेतून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळीसरपंच सुमनताई अभिमन्यू गायकवाड या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.तर गावातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी महिला दिनानिमित्त गावातून जनजागृती फेरी काढून महिला सक्षमीकरणाबाबत घोषणा दिल्या यावेळी महिलांच्या अधिकाराबाबत मार्गदर्शन करण्यात येऊन,आता पुरुषाच्या नावापुढे आईचे नाव लावणे बंधनकारक करून एका अर्थाने स्त्री शक्तीचा सन्मानच करण्यात आल्याची माहितीही उपस्थित महिलांना देण्यात आली.याप्रसंगी पुष्पाबाई शेजवळ, अंगणवाडी कर्मचारी, पुष्पा पिराजी निकम ,आशा कर्मचारी , सीमा राजेंद्र निकम ,बालवाडी कर्मचारी, सुमनबाई महादू उगले ,माजी सरपंच , नीता संदेश सांगळे बचत गट व महिला भगिनी आणि ग्रामस्थ बहुसंख्येने हजर होते.






