Home उतर महाराष्ट्र सुझलाँन कंपनीच्या पवनचक्की टाँवर प्रकल्पाविरोधात युवा मराठा महासंघाचा आमरण उपोषणाचा इशारा

सुझलाँन कंपनीच्या पवनचक्की टाँवर प्रकल्पाविरोधात युवा मराठा महासंघाचा आमरण उपोषणाचा इशारा

419

आशाताई बच्छाव

1001303887.jpg

सुझलाँन कंपनीच्या पवनचक्की टाँवर प्रकल्पाविरोधात युवा मराठा महासंघाचा आमरण उपोषणाचा इशारा
(संदीप पाटील/राजेंद्र पाटील राऊत)
टिटाणे/साक्री:- सुझलाँन कंपनीच्या पवनचक्की टाँवर प्रकल्पाविरोधात युवा मराठा महासंघाच्या वतीने आमरण उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सुझलाँन कंपनीच्या पवनचक्की टाँवरचे कार्यक्षेत्र हे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील डोंगराळ व वनविभागाच्या जमिनीवर तसेच आदिवासी इनामी जमिनीवर असून,या परिसरात सुमारे पंधराशे पवनचक्की टाँवर उभारण्यात आलेले असून,आज रोजी हे टाँवर निष्कासित करण्याचे काम मध्यरात्रीच्या सुमारास बेकायदेशीरपणाने सुरूंग लावून उध्वस्त केले जात आहेत.त्यामुळे सदरच्या जमिनीवर मोठं मोठ्या स्वरूपात भगदाड स्वरूपात खड्डे पडत असून,हि शासकीय संपत्तीची नासधूस सर्रासपणे सुरू आहे.त्याशिवाय इतरही गंभीर प्रश्नावर सुझलाँन कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाकडून बेकायदेशीर कामे सुरू असल्याने त्याला वेळीच आळा घालून झालेल्या गैरकारभाराची योग्य त्या पुराव्यासकट माहिती न दिल्यास १७ मार्च २०२५ पासून सुझलाँन कंपनीच्या पेटले येथील कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष यांनी दिला आहे.

Previous articleप्रा. डॉ. बी आर कत्तुरवार यांची अमरावती विद्यापीठाच्या आर आर सी समितीवर नियुक्ती
Next articleरोझे गावी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.