Home नाशिक रोझे गावी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा!

रोझे गावी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा!

145

आशाताई बच्छाव

1001304879.jpg

रोझे गावी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा!       मालेगाव प्रतिनिधी:- आज आठ मार्च जागतिक महिला दिन रोझे गावी सहायक पोलिस निरीक्षक अभिमन्यू गायकवाड यांच्या संकल्पनेतून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळीसरपंच सुमनताई अभिमन्यू गायकवाड या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.तर गावातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी महिला दिनानिमित्त गावातून जनजागृती फेरी काढून महिला सक्षमीकरणाबाबत घोषणा दिल्या यावेळी महिलांच्या अधिकाराबाबत मार्गदर्शन करण्यात येऊन,आता पुरुषाच्या नावापुढे आईचे नाव लावणे बंधनकारक करून एका अर्थाने स्त्री शक्तीचा सन्मानच करण्यात आल्याची माहितीही उपस्थित महिलांना देण्यात आली.याप्रसंगी पुष्‍पाबाई शेजवळ, अंगणवाडी कर्मचारी, पुष्पा पिराजी निकम ,आशा कर्मचारी , सीमा राजेंद्र निकम ,बालवाडी कर्मचारी, सुमनबाई महादू उगले ,माजी सरपंच , नीता संदेश सांगळे बचत गट व महिला भगिनी आणि ग्रामस्थ बहुसंख्येने हजर होते.

Previous articleसुझलाँन कंपनीच्या पवनचक्की टाँवर प्रकल्पाविरोधात युवा मराठा महासंघाचा आमरण उपोषणाचा इशारा
Next articleआग्रीपाडा म्युनिसिपल हायस्कूल विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला स्नेहसंमेलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.