Home भंडारा दैनिक माझा मराठवाडा चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार 2025...

दैनिक माझा मराठवाडा चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार 2025 ने सन्मानित

152

आशाताई बच्छाव

1001287451.jpg

दैनिक माझा मराठवाडा चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार 2025 ने सन्मानित

 

संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)-महाबोधी उपासक संघ नागपूर च्या वतीने शांतीवन वन बुद्ध विहार चिचाळ येथे 11 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे मुख्य संपादक दसरथ सुरडकर यांना महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार 2025 च्या पुरस्काराने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा भंडारा च्या वतीने त्याचप्रमाणे महाबोधी उपासक संघ शांतीवन बुद्ध विहार चिचाळ च्या वतीने सन्मानचिन्ह , पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष पवनी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा सरपंच शिवशंकर मुंगाटे अड्याळ, अड्याळ येथील ग्रामपंचायत अधिकारी पोर्णिमा साखरे, साहित्यिक अमृत बनसोड ,माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, प्रेस संपादक वपत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे तसेच संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, शांतीवन बौद्ध विहाराचे संचालक जीवन बोधी बौद्ध ,शांतीवन बौद्ध विहाराचे अध्यक्ष धम्मरक्षित बौद्ध (मेश्राम) , भीमशक्ती संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी रामराव गाडेकर , भंडारा जिल्हा संविधान संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभुळकर , डॉ. अक्षय कहालकर ,असित बागडे, दैनिक माझा मराठवाडा चे वृत्तसंपादक प्रवीण तायडे, दैनिक माझा मराठवाडाचे कार्यकारी संपादक संजय दांडगे , पत्रकार डी. जी. रंगारी, कवी व साहित्यिक मकरंद पाटील जळगाव ,सत्यफुला जीवनबोधी बौद्ध प्रामुख्याने उपस्थित होते. त्याचप्रमाणे बौद्ध उपासिक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.